BJP Leader MLA Sandeep Joshi Launches ‘Sohbat Parenthood Project’ : कोरोनाच्या काळात झाली होती सुरूवात
Nagpur : कोरोनाच्या काळात वडिलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना आणि एकल पालकत्वाची जबाबदारी खांद्यांवर येऊन पडलेल्या मातांना आधार देण्यासाठी सोबत पालकत्व प्रकल्प उभा राहिला. गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने चालणारा हा उपक्रम शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, समुपदेशन, पोषण या पाच तत्वांवर कार्यरत आहे. दरवर्षी या परिवारांसाठी राखी आणि दिवाळी या दोन सणांना स्नेहसोहळे साजरे केले जातात.
एकल पालकत्वाची जबाबदारी आलेल्या मातांसाठी सोबत पालकत्व प्रकल्प म्हणजे त्यांचे माहेर आहे. या प्रकल्पाचे प्रणेते आमदार संदीप जोशी आहेत आणि त्या मायेच्या घराचे ते आधारस्तंभ आहेत. श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट नागपूरतर्फे राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा दिवाळी मिलन सोहळा लक्ष्मी नगर येथील जेरील लॉनमध्ये उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. मंचावर देवयानी संदीप जोशी यांच्यासह कार्यक्रमाचे संचालक आनंद टोळ, ज्योत्स्ना कुऱ्हेकर, प्रकाश रथकंठीवार, प्रणय मोहिते आणि प्रणव घुगरे उपस्थित होते.
Chandrashekhar Bawankule : परिवहन मंत्र्यांसमोरच बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना झापले !
ज्यांच्या आयुष्यातील आधार तुटला, त्यांना नव्याने जगण्याची प्रेरणा देणारा सोबत पालकत्व प्रकल्प हा खऱ्या अर्थाने मानवतेचा उत्सव आहे, असे प्रतिपादन देवयानी जोशी यांनी यावेळी केले. प्रकल्पाशी जोडलेल्या पालकांना आणि त्यांच्या परिवारांना दिवाळीनिमित्त आमदार संदीप जोशी यांच्याकडून भाऊबीचेची ओवाळणी म्हणून एक महिन्याची राशन किट भेट देण्यात आली. या भावनिक मिलन सोहळ्याने स्वयंसिद्ध मातांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वासाचा दिवा पुन्हा उजळला, अशा प्रतिक्रिया कार्यक्रमस्थळी उमटल्या.








