Congress Members Cooked Bhakri in Front of the Tehsil Office : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिदोरी आंदोलन, सरकारचा निषेध
Amravati राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ३१ हजार ६२८ कोटींच्या मदतीचे आश्वासन दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे जाहीर केले होते. तथापि, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खिशात एक रुपयाही न आल्याने नाराज शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे चांदूर बाजारसह जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर. काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘शेतकऱ्यांची काळी दिवाळी’ आंदोलन आयोजित करण्यात आले.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख व खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी तहसील परिसरातच चुली थापून बेसन भाकरी तयार केली आणि शिदोरी आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
देशमुख म्हणाले, शेतकरी उन्हातान्हात राबूनही शासनाच्या मदतीपासून वंचित आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन चांदूर बाजार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत दिवाळीपूर्वी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.
राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असतानाही सरकारने दिवाळीच्या तोंडावर कोणतीही मदत, कर्जमाफी किंवा दिलासा दिलेला नाही. विशेषतः अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. शेतीपिकांचे नुकसान झाले तरी सरकार मौन आहे. शासनाने शेतकऱ्यांची थट्टा न करता तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली.
Vijay Wadettiwar : सरकारने केली मंत्र्यांच्या मलिदा खाण्याची सोय !
राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विवंचनेविरोधात काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर ‘शेतकऱ्यांची काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.