Randhir Sawarkar Amol Mitkari : आमदार सावरकर शेतकऱ्यांच्या टार्गेटवर!

Farmers to protest at MLAs’ Residences today : आज घराला घेराव घालणार, मिटकरींवरही व्यक्त होणार रोष

Akola राज्यात सरकारने शेतमाल खरेदी केंद्रे सुरू करण्याची घोषणा केली असली, तरी दिवाळीपूर्वी ती केंद्रे सुरू न झाल्याने व्यापाऱ्यांकडून शेतमालाच्या लुटीचा प्रकार सुरूच आहे. किसान ब्रिगेडने इशारा दिल्यानुसार आज, शुक्रवार, २४ ऑक्टोबरला विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या आरोग्य नगर येथील निवासस्थानासमोर घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.

किसान ब्रिगेडने जाहीर केले आहे की, हे आंदोलन सर्व सत्तारूढ पक्षातील आमदारांच्या घरासमोर करण्यात येणार असून, त्याची सुरुवात अकोल्यातून होईल. पहिला घेराव आमदार अमोल मिटकरी यांच्या घरासमोर घालण्यात येणार आहे.

Bacchu Kadu : मुख्यमंत्री विदर्भाचे असूनही विदर्भावर अन्याय

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. परंतु मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. घरात असलेले थोडेफार सोयाबीनदेखील व्यापाऱ्यांनी अतिशय कमी दरात विकत घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

सरकारने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी दिला आहे.

सर्व शेतकऱ्यांनी हिंगणा फाटास्थित चौकात सकाळी १० ते ११ या वेळेत जमावे, त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती किसान ब्रिगेडचे अध्यक्ष दिवाकर गावंडे व कार्याध्यक्ष शरद वानखडे यांनी दिली.

घेराव आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान ब्रिगेडचे गजानन अमदाबादकर, प्रदीप जंजाळ, दादाभाऊ पाटील गावंडे, भगवंतराव गवळी, राजेश मावळे, धनंजय मिश्रा, रामधन दामोदर, सिद्धार्थ तायडे आदींनी केले आहे.

या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “किसान ब्रिगेडच्या वतीने शेतकरी माझ्या घरापर्यंत येत असतील, तर मी त्यांचे स्वागत करीन. शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू असून, याबाबत माझे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी बोलणे झाले आहे.”

Bhushan Gawai : भुतानचे संविधान म्हणजे स्वातंत्र्य आणि सामूहिक प्रगतीचा सुंदर संगम !

किसान ब्रिगेडने दिलेल्या माहितीनुसार, आमदार मिटकरी यांच्या निवासस्थानानंतर भाजप नेते खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह विरोधी पक्षांच्या आमदारांच्या घरासमोरही घेराव घालण्याचा कार्यक्रम होणार आहे.