Cyclone Montha: मोंथा चक्रीवादळाचा तडाखा; ताशी 100 किमी वेगाने सुटली हवा,

Trains and flights cancelled, Maharashtra also in crisis; Next three days dangerous : ट्रेन-फ्लाईट रद्द, महाराष्ट्रावरही संकट; पुढचे तीन दिवस धोक्याचे

New Delhi : देशावर सध्या मोंथा चक्रीवादळाचे मोठे संकट आले आहे. या वादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, वारे ताशी 100 किलोमीटर वेगाने सुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित, झाडे पडली, रस्ते बंद झाले आणि वाहतूक ठप्प झाली आहे.

भारतीय हवामान विभागानुसार, बुधवारी रात्री मोंथा चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टणम किनाऱ्यावर जोरदार धडक दिली. त्या वेळी वाऱ्याचा वेग 90 ते 100 किमी प्रतितास इतका होता. समुद्राने रौद्ररूप धारण केले असून किनारपट्टी भागात मोठे नुकसान झाले आहे.

चक्काजाम आंदोलनात आमदार राजू बकाने अडकले

या चक्रीवादळामुळे रेल्वे आणि विमानसेवांवर मोठा परिणाम झाला आहे. सुमारे 120 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर विशाखापट्टणमहून जाणारी 32 उड्डाणे आणि विजयवाडा विमानतळावरील 16 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. काही ठिकाणी रात्रभर प्रशासनाकडून झाडे हटवण्याचे आणि वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

फक्त आंध्र प्रदेशमध्येच सुमारे 38,000 हेक्टरवरील पिके पूर्णपणे नष्ट झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक घरांचे छप्पर उडाले असून, काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ओडिशामधील किनारपट्टी भागांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मोंथा चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही जाणवतोय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहताना दिसत आहेत. राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी इशारा जारी केला असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Local body election : निवडणुकीसाठी फक्त उत्साह नाही, ‘दारूगोळा’ही दाखवा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव पुढील 72 तास कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात किनारपट्टी भागात वारे अधिक वेगाने सुटतील आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यकतेशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.