Alliance of PRP Only with Shinde Shivsena : प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले यांची घोषणा; जाधव-इंगोले चर्चेनंतर युती निश्चित
Malkapur आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी (PRP) ही युती फक्त शिवसेना (शिंदे गटासोबतच) करणार असल्याचे स्पष्ट करत पीरिपाचे प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले यांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण दिले आहे.
पीरिपाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून देऊळगाव राजा नगराध्यक्षपदासह काही ठिकाणी जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले. या चर्चेमुळे जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता बळावली आहे.
बुलढाणा येथे आयोजित जिल्हा बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष गौतमभाई कासारे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांच्या उपस्थितीत पक्षाची धोरणात्मक बैठक पार पडली.
या बैठकीत स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती, उमेदवारी आणि जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत शिवसेना (शिंदे गट) हा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा परंपरागत मित्र असल्याने युती कायम ठेवण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
Vanchit Bahujan Aghadi : “आता आमदार-खासदारांना तेल लावा, स्वराज्यात सत्ता वंचितांची आणा!”
बैठकीत बुलढाणा नगरपालिकेतील मिलिंद नगर येथील राखीव जागा, मलकापूर पंतनगर प्रभाग क्र. १ आणि जिल्ह्यातील इतर ५ ते ७ जागा पीरिपाला देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीचे लेखी निवेदन शिवसेना (शिंदे गट) व केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांना देण्यात आले असल्याचे सावळे यांनी सांगितले.
Sharad Pawar : साहेब, एकटेपण सहन होत नाही, पत्नी मिळवून द्या!
बैठकीला जिल्हा महासचिव कैलास नरवाडे, उपाध्यक्ष गजानन तायडे, प्रमोद वानखेडे, मधुकरराव शिंदे, युवक अध्यक्ष विकासभाई कासारे, सचिव भास्करराव इंगळे, महासचिव एकनाथराव होडगरे, तसेच विविध तालुकाध्यक्षांसह मलकापूर, मेहकर, लोणार, नांदुरा, देऊळगावराजा व सिंदखेडराजा येथील कार्यकर्ते उपस्थित होते.








