Local Body Elections : काँग्रेसने प्रभाग रिक्त ठेवला, अशांतभाई वानखेडे अविरोध विजयी

A major political development in the Malkapur Municipal Council election : मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड

Malkapur नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले असतानाच प्रभाग क्र. १४ (अनुसूचित जाती-जमाती राखीव) मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपचे अशोक उर्फ अशांतभाई वानखेडे हे प्रतिस्पर्ध्याचा अर्ज बाद झाल्याने अविरोध निवडून आले आहेत.

प्रभाग १४ अ मध्ये काँग्रेसने उमेदवार न देता माघार घेतली होती. त्यामुळे स्पर्धा अशांतभाई वानखेडे व अपक्ष उमेदवार वृषभ शंकर क्षिरसागर यांच्यात होती.

आज झालेल्या छाननीदरम्यान अपक्ष क्षिरसागर यांच्या अर्जात तांत्रिक त्रुटी आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी त्यांची उमेदवारी बाद घोषित केली. परिणामी एकमेव वैध उमेदवारी शिल्लक राहिल्याने अशांतभाई वानखेडे यांचा अविरोध विजय निश्चित झाला.

Tiger’s terror : नागपूरमध्ये बिबट्याचा हल्लाबोल; भांडेवाडीतील घरात बिबट्या शिरल्याच्या वृत्ताने खळबळ !

विजयाची अधिकृत बातमी कळताच समर्थकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमून अभिवादन केले. त्यानंतर बुलढाणा रोडमार्गे विजयी मिरवणूक काढत शहरातून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विविध पक्षांचे नेते, नगरातील मान्यवर व नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच मिरवणुकीत सहभागी होऊन अशांतभाई वानखेडे यांचे अभिनंदन केले.