Mohan Bhagwat : बंधुता हा भारताचा खरा धर्म; सरसंघचालकांचा आदिवासी नेतृत्वाशी संवाद !

Brotherhood is the true religion of India; Sarsanghchalak’s interaction with tribal leadership : मणिपूरच्या सामाजिक सलोख्याला नवी दिशा; इंफाळमध्ये २०० हून अधिक आदिवासी प्रतिनिधींशी चर्चेत एकता, शांतता आणि चारित्र्यविकासाचा संदेश

Manipur – Imphal : मणिपूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी इंफाळमध्ये विविध आदिवासी समुदायांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश दिला. बंधुता हा भारताचा धर्म आहे. समाज आणि राष्ट्रात शाश्वत शांतता, सौहार्द आणि प्रगती साधायची असेल तर एकता आणि चारित्र्यनिर्मिती यांना पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

इम्फाळ शहरातील भास्कर प्रभा कॅम्पस येथे आयोजित संवाद सत्राला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. विविध आदिवासी समुदायांतील २०० हून अधिक प्रतिनिधींनी यात सक्रिय सहभाग घेतला. संवादानंतर पारंपारिक मणिपुरी पद्धतीने जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. एकत्र भोजन, परंपरेचा आदर आणि सांस्कृतिक वैविध्यातून एकता, या घटकांचे सुंदर प्रदर्शन या कार्यक्रमात पाहायला मिळाले.

Minority Rights Day : १८ डिसेंबरला ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’ राज्यभर होणार साजरा !

सरसंघचालकांनी भाषणात सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पूर्णतः सामाजिक कार्य करणारे संघटन असून त्याचे उद्दिष्ट समाजाला बळकट करणे आहे. संघ कोणाच्याही विरोधात नाही. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी त्याची स्थापना झाली, तो कधीच विभाजनासाठी नव्हता. त्यांनी आदिवासी समुदायांची परंपरा, संस्कृती, संघर्ष आणि समाजातील योगदान यांचे विशेष कौतुक केले.
मणिपूरमध्ये गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा संवाद अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Election campaign : मोबाईलच्या स्क्रीनवर उडतोय प्रचाराचा धुरळा !

समाजातील परस्पर विश्वास, संवाद आणि सहयोग वाढवणे हेच खरे पुनरुत्थानाचे साधन असल्याचे डॉ. भागवत यांनी अधोरेखित केले. सरसंघचालकांनी पुढे सांगितले की भारतीय संस्कृतीची खरी ओळख ही विविधतेतल्या एकतेत आहे. आपली ओळख वेगळी असू शकते, परंतु रक्ताचे नाते, भूमीशी असलेले प्रेम आणि परस्पर बंधुत्वाचे मूल्य हेच भारताला जोडून ठेवते. विविध आदिवासी नेतृत्वानेही सरसंघचालकांशी संवाद साधताना समाजातील ताण–तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि परस्पर सहजीवनासाठी संघटित प्रयत्नांची गरज व्यक्त केली. मणिपूरमधील सलोखा, विश्वास आणि सांस्कृतिक ऐक्याला नवी दिशा देणारा हा संवाद पुढील काळात सकारात्मक बदलांसाठी महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो, अशी भावना सहभागी प्रतिनिधींनी व्यक्त केली.