Jansangharsh Urban Fund Mastermind Seized : चौघांना लोणावळा येथे केली अटक
Yavatmal दिग्रस येथील बहूचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड प्रणीत याच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई एसआयटी व एलसीबी पथकाने लोणावळा येथे १४ जानेवारीला रात्री उशिरा केली.
प्रणित देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मण मोरे, प्रीतम देवानंद मोरे व जयश्री देवानंद मोरे अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लि. च्या सात शाखेत सहा हजार २०० खातेदारांची ४४ काेटींनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पाेलिसांनी साहील जयस्वाल व त्याच्या आईवडिलाला अटक केली होती. एकाची पोलिस कोठडी तर दोघांची न्यायालयीन कोठडी बुधवारी संपत असल्याने या तिघांना दारव्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अपहारातील मुख्य सूत्रधार प्रणीत व त्याचे कुटुंब महिनाभरापासून पसार होते. तीन पोलिस पथकांकडून त्यांचा कसून शोध सुरू होता. आरोपी लोणावळा येथे असल्याची माहिती मिळताच पोलिस रवाना झाले. मंगळवारी रात्री उशिरा चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींना दिग्रस येथे आणले असल्याची माहिती आहे.
Fraud with unemployed : आम्ही सत्तेत आहोत, विना परीक्षा थेट रेल्वेत नोकरी मिळून देऊ!
बॅटरी चोरणाऱ्यांना अटक
टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. शहरातील आर्वी नाका परिसरातील वडार झोपडपट्टीत राहणाऱ्या पाच महिलांसह त्यांच्याकडून बॅटरी विकत घेणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना पुढील तपासाकरिता शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
Mahayuti Government : मेहकरमधील बेरोजगारांसाठी धावून आला ‘रोजगार मेळावा’!
वर्धा शहरातील वोडाफोन कंपनीच्या टॉवरच्या एकूण २४ बॅटऱ्या चोरी गेल्या होत्या. याप्रकरणी विवेक चंद्रशेखर गांजरे रा. कन्नमवारग्राम हल्ली मुक्काम स्टेट बँक कॉलनी वर्धा यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाचा समांतर तपास करीत होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आर्वी नाका वडार झोपडपट्टीतील अनिता दशरथ जाधव (३०), लक्ष्मी सुरेश मुंदेवार (३६), शोभा सुरेश सातपुते (३०), जोत्सना दादाराव मुळे (२८), कमला सुनील मुळे (४०) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.