RPI workers stage protest in front of BJP office : पुणे भाजपच्या कार्यालयासमोर आरपीआय च्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
Pune : पुणे महापालिका निवडणुकीतील जागावाटपावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून त्यांनी भाजप पुणे शहर कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युतीत जागावाटपाची चर्चा सुरू होती. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी नियमाप्रमाणे मुलाखती दिल्या होत्या. अनेक कार्यकर्ते गेली वीस ते चाळीस वर्षे पक्षासाठी काम करत असून या वेळी त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र भाजपने सहा जागा सोडताना थेट उमेदवारांची नावे जाहीर केली आणि त्यात मूळ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते नसल्याने नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला.
या निर्णयामुळे रिपब्लिकन पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, पक्षनिष्ठा आणि दीर्घकाळ केलेल्या कामाचा सन्मान न करता बाहेरील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचा अपमान झाला आहे. मूल आरपीआय च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता इतरांनाच उमेदवारी मिळालेली आहे. यामुळेच हा रोष वाढलेला आहे.
Nagpur municipal corporation election : कट्टर समर्थकांना उमेदवारी नाकारली, नव्या चेहऱ्यांना संधी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यापूर्वीच पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला चाम्गल्या जागा द्याव्यात अशी मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात भाजपने केवळ सहा जागा सोडल्या आणि त्यातही उमेदवारांची नावे निश्चित करून दिल्याने कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोर जावे लागत आहे. आता पाहायचे आहे की आरपीआय प्रमुख रामदास आठवले कोणत्या प्रकारची भूमिका घेणार आहेत.








