Ajit Pawar : अजितदादांनी गँगस्टरच्या बायकोला दिली उमेदवारी

Wife of a gangster gets candidature from NCP : पुण्यात खळबळ; कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी राष्ट्रवादीकडून रिंगणात

Pune पुणे शहरातील राजकारणात मोठा धक्का बसवणारी घटना घडली आहे. कुख्यात गँगस्टर गजानन उर्फ गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी फॉर्म देण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय वातावरणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

गजा मारणे हा पुण्यातील गुन्हेगारी जगतातील एक मोठे नाव आहे. त्याच्या नावावर खंडणी, मारामारी, हल्ले अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही काळापूर्वी त्याला येरवडा कारागृहातून संगली कारागृहात हलवण्यात आले होते. त्याची पत्नी जयश्री मारणे या पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर नगरसेविका राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांना राजकारणाचा अनुभव आहे.

Rahul Narvekar : कुटुंब रंगलंय राजकारणात; भाजपच्या ‘परिवारवादा’वरून वाद!

अलीकडेच जयश्री मारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाबाबत चर्चा रंगली होती. अखेरीस अजित पवार गटाने त्यांना उमेदवारी देऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाल्याने स्थानिक पातळीवर मोठे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

Chainsukh sancheti : चंद्रपुरात भाजपाचा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा, चैनसुख संचेतींच्या निर्णयांनी घातला धिंगाणा

या निर्णयावर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला राजकारणात स्थान देणे योग्य नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र समर्थकांचा युक्तिवाद असा आहे की जयश्री मारणे यांचा गुन्हेगारीशी थेट संबंध नाही आणि त्यांनी पूर्वी नगरसेविका म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना संधी देण्यात काही गैर नाही.