Breaking

SP Nagpur Rural : पोलीस अधिक्षकांच्या सुरक्षा रक्षकाने गोळी झाडून घेतली !

The Superintendent of Police’s security guard attempted suicide : आत्महत्येचा प्रयत्न; आर्थिक विवंचनेत असल्याचा अंदाज

Nagpur नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शासकीय पिस्तुलीतून गोळी झाडून घेत त्याचे आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षारक्षकाने सुसाईड नोट Suicide Note लिहिली आहे. पण त्यात काय लिहिले, हे अद्याप उघड झालेले नाही.

गोळी झाडण्याच्या आवाजामुळे सहकारी कर्मचारी आणि पोलीस अधीक्षकांनी धाव घेतली. त्याला गंभीर जखमी अवस्थेत एम्समध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशाल तुमसरे (वय ५०, रा.जयताळा) असे या हवालदाराचे नाव आहे. ही घटना घडताच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि हिंगण्याचे ठाणेदार जितेंद्र बोबडे यांनी घटनास्थाळावर धाव घेतली.

Pair of bulls in Shankarpat : जिल्ह्यातून ‘केसरी-मन्या’, तालुक्यातून ‘चिमणा-जगवार’ प्रथम

तुमसरे हे ग्रामीण पोलीस दलात पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर त्यांची गार्ड ड्युटी आहे. शुक्रवारी रात्रपाळीत कर्तव्यावर हजर होते. आज, शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास विशाल गार्ड रुममध्ये होते. त्यावेळी शासकीय पिस्तूलातून हनुवटीतून गोळी झाडून घेतली. गोळी हनुवटीतून थेट डोक्याच्या दिशने बाहेर गेली. गोळी झाडण्याचा आवाज ऐकू येताच पोलीस अधीक्षकासह एका कर्मचाऱ्याने गार्ड रुमकडे धाव घेतली. विशाल हे रक्ताच्या थारोळ्यात तडफडताना दिसले. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Gondia Police : सीट बेल्ट लावला नाही, ५५ लाख २३ हजार रुपयांचा दंड !

पत्नी आणि दोन मुली असा विशाल यांचा परिवार आहे. त्यांची पत्नी एका खासगी शाळेत नोकरी करते. विशाल यांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतविला होता. मात्र, त्यात बराच पैसा बुडल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यांना कौटुंबिक समस्या आणि पैशाची चणचण होती, असंही बोलंल जात आहे.