Nagpur Municipal Corporation : आधी झिडकारले, आता पाठिंबा कशाला द्यायचा? मुस्लिम लीगने काँग्रेसला सुनावले

muslim-league-rejects-congress-alliance-proposal : निवडणुकीपूर्वीच्या वादाचा वचपा; लीग आणि एमआयएमच्या युतीमुळे काँग्रेसचे राजकीय गणित बिघडले

Nagpur नागपूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेसने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्याशी वाटाघाटी सुरू ठेवल्या होत्या. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ही महाविकास आघाडी तुटल्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयाचा फटका काँग्रेससह सर्वच मित्रपक्षांना बसला. काँग्रेसचे केवळ ३४ नगरसेवक निवडून आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. दुसरीकडे, उद्धव सेनेने आपले दोन नगरसेवक निवडून आणत आपली संख्या कायम राखली आहे.

महापालिकेत आपल्या गटाचे संख्याबळ वाढवून स्वीकृत सदस्य आणि स्थायी समितीत शिरकाव करण्यासाठी काँग्रेसने आता उद्धव सेनेला सोबत घेऊन गट स्थापन केला आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून मुस्लिम लीगलाही सोबत येण्याचे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले होते. मात्र, मुस्लिम लीगने काँग्रेसचा हा प्रस्ताव फेटाळून लावला असल्याचे आता समोर आले आहे.

Ajit pawar plane crash : अजित पवार विमान दुर्घटनेवरून राजकारण तापले

महापालिका निवडणुकीत मुस्लिम लीगचे ४ आणि एमआयएमचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. सुरुवातीला या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र गट स्थापन केले होते, परंतु स्वीकृत सदस्य आणि स्थायी समितीसाठी लागणारे आवश्यक संख्याबळ लक्षात घेता हे दोन्ही पक्ष आता एकत्र आले आहेत. या नव्या युतीमुळे आता या गटाचा एक स्वीकृत सदस्य आणि स्थायी समितीत एका नगरसेवकाचा समावेश निश्चित झाला आहे.

काँग्रेसने या दोन्ही पक्षांना आपल्या गटात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला होता. एमआयएम आणि मुस्लिम लीगचे १० नगरसेवक सोबत आले असते, तर काँग्रेस पुरस्कृत गटाची संख्या ४६ वर पोहोचली असती. यामुळे काँग्रेसला तीन स्वीकृत सदस्य आणि स्थायी समितीत पाच जागा मिळवणे सोपे झाले असते. मात्र, निवडणुकीपूर्वीचा हिशोब लीगने अद्याप विसरलेला नाही. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मुस्लिम लीगने काँग्रेसकडे ८ जागांची मागणी केली होती, परंतु काँग्रेसने हा प्रस्ताव धुडकावून लावला होता.

त्याचाच वचपा काढत लीगच्या नगरसेवकांनी आता काँग्रेसने मदतीसाठी पुढे केलेला हात झिडकारला आहे. “जर तेव्हा ८ जागा सोडल्या असत्या तर मतांचे विभाजन टळले असते आणि आमचे किमान ८ उमेदवार निवडून आले असते,” असा दावा लीगच्या नेत्यांनी केला आहे.

Bharat band : केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी संप

या निवडणुकीत एमआयएमने अनपेक्षित मुसंडी मारली असून, त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सत्तापक्षनेते संजय महाकाळ एमआयएमच्या या लाटेत थोडक्यात बचावले आहेत. ईव्हीएममधील मतमोजणीत ते पिछाडीवर होते, मात्र टपाल मतांच्या (Postel Ballots) जोरावर त्यांनी निसटता विजय मिळवला. आता मुस्लिम लीग आणि एमआयएमच्या एकत्र येण्यामुळे महापालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून काँग्रेसची कोंडी झाली आहे.