mumbai-coastal-road-first-musical-road-in-india-jai-ho-tune : मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘मेलोडी रोड’चे लोकार्पण; वेगमर्यादा पाळली तरच ऐकू येणार संगीत
Mumbai मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, देशातील पहिला ‘म्युझिकल रोड’ (संगीत रस्ता) आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. कोस्टल रोडवरून प्रवास करताना वाहनचालकांना आता ऑस्करविजेत्या ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकता येणार आहे. केवळ मनोरंजनच नव्हे, तर रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे आणि वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
हा रस्ता नरीमन पॉईंट ते वरळी या मार्गावर सुमारे ५०० मीटर लांबीचा तयार करण्यात आला असून, त्याचे तंत्रज्ञान अत्यंत रंजक आहे. रस्त्याच्या पृष्ठभागावर ठराविक अंतरावर सूक्ष्म खाचा (Grooves) कोरण्यात आल्या आहेत. जेव्हा वाहन या पट्ट्यावरून धावते, तेव्हा टायर आणि रस्त्यामधील घर्षणामुळे कंपने निर्माण होतात आणि त्यातून ‘जय हो’ची धून ऐकू येते. ही धून स्पष्ट ऐकण्यासाठी वाहनाचा वेग ७० ते ८० किलोमीटर प्रतितास असणे अनिवार्य आहे. वेग कमी किंवा जास्त झाल्यास संगीताचा सूर बिघडतो, ज्यामुळे चालकाला वेगाचा अंदाज येतो.
Supriya sule : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर रोहित पवारांचा संशय !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड (दक्षिण) मधील अमरसन्स गार्डन ते ब्रिच कँडी दरम्यानच्या या संगीत रस्त्याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. “संगीताच्या माध्यमातून वेगमर्यादा पाळण्याचा हा सकारात्मक संदेश आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘जय हो’ या जागतिक कीर्तीच्या धूनमुळे वाहनचालकांमध्ये सकारात्मकता आणि प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Sanjay Raut : “नीट धोतर नेसता येत नाही आणि आम्हाला अक्कल शिकवतो”
जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये अशा प्रकारचे रस्ते यापूर्वीच यशस्वी झाले आहेत. भारतात हा पहिलाच प्रयोग असून, यासाठी विशेष तांत्रिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. रस्त्याच्या मजबुतीला कोणताही धक्का न लावता तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबवण्यात आला आहे.








