Gram Panchayat elections : ‘मिनी मंत्रालया’चा सत्तासंघर्ष पेटणार! ६० ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी

chikhli-gram-panchayat-election-2026-political-strategy-60-villages : प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाने गावोगावी राजकीय चुरस; ‘प्रशासक’ नियुक्तीवरून गावपातळीवर संतापाचा सूर

Chikhli राज्यातील मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा अधिकधिक कार्यक्रम जाहीर होताच, चिखली तालुक्यातील ग्रामीण राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. तालुक्यातील तब्बल ६० ग्रामपंचायती या प्रक्रियेत समाविष्ट असल्याने, येत्या काळात गावपातळीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय हालचालींना प्रचंड वेग येण्याची चिन्हे आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजल्याने सत्तेसाठी आतापासूनच गावोगावी गुप्त बैठका आणि व्यूहरचना आखण्याचे सत्र सुरू झाले आहे.

शासनाच्या अधिकृत कार्यक्रमानुसार, २० फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचे काम सुरू होणार असून ७ एप्रिलला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. सुमारे अडीच महिन्यांची ही प्रक्रिया तीन टप्प्यांत पूर्ण होणार असली तरी, तालुक्यात निवडणुकीच्या चर्चांना आताच उधाण आले आहे.

Shiv Jayanti 2026 : एनसीईआरटीच्या पुस्तकातून १७५९ मधील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; मुधोजीराजे भोसले यांचा गंभीर आरोप

गावचे चौक, मंदिर परिसर, शेतबांध आणि चहाच्या टपऱ्यांवर संभाव्य उमेदवार, पक्षांतर्गत गटबाजी आणि नव्या समीकरणांवर खडाजंगी चर्चा रंगू लागली आहे. ग्रामीण भागातील मतदार कोणाच्या बाजूने झुकणार, यावरून राजकीय गणिते मांडली जात आहेत.

तालुक्यातील एकूण ९९ ग्रामपंचायतींपैकी ६० ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने या निवडणुकांना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. जरी या निवडणुका थेट पक्षचिन्हावर लढवल्या जात नसल्या, तरी पडद्यामागून विविध राजकीय पक्षांनी आपापल्या समर्थकांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य या ग्रामपंचायत निकालांवर अवलंबून असल्याने सर्वच पक्षांनी याला ‘प्रतिष्ठेची लढाई’ बनवले आहे.

दुसरीकडे, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचालींना स्थानिक पातळीवर तीव्र विरोध होत आहे. गावचा कारभार लोकनियुक्त सरपंच व सदस्यांकडेच ठेवावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांमधून पुढे येत आहे. या संदर्भातील पेच सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकला असून, अंतिम निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे डोळे लागले आहेत.

Devendra Fadnavis, Mahavitaran : विजेच्या दरात खरोखरच कपात होणार? महावितरणच्या अध्यक्षांचा दावा

आरक्षणाच्या तांत्रिक अडचणींमुळे यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या; मात्र आता ग्रामपंचायत निवडणुका वेळेत पार पाडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. एकूणच, चिखली तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा सरिपाट आता अत्यंत रंगतदार आणि संघर्षाच्या टप्प्यात प्रवेश करताना दिसत आहे.