Amol-Mitkari-alleges-that-Ajit-Pawar-was-assassinated-in-a-manner-similar-to-Rajiv-Gandhi : वैमानिक सुमित कपूर याच्यावर गंभीर संशय, राजकारण तापले
Mumbai माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेला महिना पूर्ण होत आला असतानाच, आता या प्रकरणावरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा वणवा पेटला आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळील विमानतळावर झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र, या अपघाताबाबत आता संशयाची सुई वैमानिकाकडे वळवण्यात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (एपी) नेते अमोल मिटकरी यांनी या घटनेची तुलना थेट ‘राजीव गांधी हत्याकांडा’शी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अकोला येथील एका कार्यक्रमात बोलताना मिटकरी यांनी वैमानिक सुमित कपूर याच्यावर गंभीर संशय व्यक्त केला. “पायलट कपूर याची मद्यप्राशन करण्याची पार्श्वभूमी होती. राजीव गांधींच्या वेळी जशी एक मुलगी सुसाईड बॉम्बर म्हणून आली होती.
Lakhni APMC : संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराचा ‘काटा‘ काढला; लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीत खळबळ
तसाच हा वैमानिक सुसाईड बॉम्बर म्हणून तर आला नव्हता ना? जर त्याची पत्नी तो जिवंत असल्याचे सांगत असेल, तर अपघातात नक्की कोणाचा मृत्यू झाला?” असे प्रश्न उपस्थित करत मिटकरी यांनी हे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. या गंभीर आरोपांमुळे तपासाला आता नवे राजकीय परिमाण प्राप्त झाले आहे.
दुसरीकडे, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्रही पाठवले असून, केंद्रस्तरावरून तपास झाल्यास सर्व शंकांचे निरसन होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. राज्य सरकार आणि नागरी उड्डाण महासंचालनालयाचा (DGCA) तपास सुरू असतानाच आता सीबीआयच्या संभाव्य प्रवेशामुळे या प्रकरणातील गूढ अधिक वाढले आहे.
या दुर्घटनेनंतर पवार कुटुंबियांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आमदार रोहित पवार आणि जय पवार यांनी प्रशासनाकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ आणि इतर तांत्रिक पुरावे सार्वजनिक करावेत, जेणेकरून सत्य समोर येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
Congress proposal : उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावे, राज्यसभा काँग्रेसला द्यावी !
सध्या तपास यंत्रणा हवामानाची स्थिती, विमानाची तांत्रिक देखभाल आणि वैमानिकाचे रेकॉर्ड्स यांचा बारकाईने अभ्यास करत आहेत. अमोल मिटकरींच्या विधानानंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष सीबीआयच्या प्रतिसादाकडे आणि तपासाच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे.








