Sudhir mungantiwar : धारदार आयुधांचा ‘अनुभवी’ वापर आणि आ.सुधीर मुनगंटीवार यांची धडाकेबाज मांडणी

Sudhir-mungantiwar-preaents-public-issues-in-maharashtra-budget-session-using-parliamentary-instruments : जनतेच्या समस्या मांडतानाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा अशासकीय ठरावही आणला

Mumbai एखादा डॉक्टर चुकला तर रुग्णाचा जीव धोक्यात येतो, एखादा अभियंता चुकला तर इमारत कोसळते, एखादा शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी भरकटू शकते. पण एखादा लोकप्रतिनिधी जर जनतेने ठेवलेल्या विश्वासापासून दूर गेला आणि जनतेच्या समस्या विधानसभेच्या पटलावर मांडताना तो अपयशी ठरला तर त्याचे परिणाम केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच लोकप्रतिनिधीपद ही केवळ राजकीय जबाबदारी नसून जनतेच्या अपेक्षा, विश्वास आणि आशांचा भार वाहणारी मोठी सामाजिक जबाबदारी आहे. त्या विश्वासाचे भान ठेवत, जनतेच्या प्रश्नांना विधानसभेच्या पटलावर प्रभावीपणे मांडणारे काही लोकप्रतिनिधी आजही राजकारणात आदर्श निर्माण करताना दिसतात; त्यापैकी एक ठळक नाव म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार.

महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले की, सभागृहात काही आवाज विशेष ठसठशीतपणे उमटतात. त्यापैकी एक ठाम, अभ्यासू आणि प्रभावी आवाज म्हणजे बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लक्षवेधी सूचना, अशासकीय ठराव, चर्चा आणि पूरक प्रश्न यांसारख्या संसदीय आयुधांचा अत्यंत कल्पकतेने वापर करत राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. एखादा अनुभवी नायक चित्रपटात जसा संघर्षातून सामान्यांना न्याय मिळवून देतो, तशीच काहीशी भूमिका आ. मुनगंटीवार सभागृहात बजावताना दिसतात.

Sudhir Mungantiwar : राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार

ऐतिहासिक ठराव आणि राष्ट्रीय अस्मिता

सुरू असलेल्या अधिवेशनात त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी अशासकीय ठराव मांडून एका ऐतिहासिक विषयाला पुन्हा अधोरेखित केले. या ठरावावर सभागृहात सकारात्मक चर्चा झाली आणि राज्य सरकारतर्फे केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासनही मिळाले. जनभावनेला विधानसभेच्या पटलावर आणून तिला अधिकृत मार्ग देण्याचे महत्त्वपूर्ण काम आ.सुधीर मुनगंटीवार यांनी या माध्यमातून केले.

Sudhir Mungantiwar : बल्लारपूर येथे टिम्बर म्युझियम – झायलेरियम मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

स्थानिक रोजगार आणि कामगार सुरक्षा

चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्पांमध्ये स्थानिक युवकांना ८० टक्के रोजगार मिळावा, ही मागणी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत आक्रमकपणे लावून धरली. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चंद्रपूरमध्ये ‘एमआईडीसीमध्ये कौशल्य विकास केंद्र’ उभारण्याचे आणि रोजगार धोरणाचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. केवळ रोजगारच नव्हे, तर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही त्यांनी तितक्याच ताकदीने मांडला. कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कारखान्यातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लक्षवेधी सूचना मांडली. सल्फ्युरिक ॲसिड टँकर लोडिंग दरम्यान जखमी झालेल्या अक्षय कन्नाके आणि स्वाती उईके या कामगारांना किमान २५ लाख रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी आ . सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यावर कामगार मंत्र्यांनी संबंधित कंपनीला जास्तीत जास्त मदत देण्याचे निर्देश दिले. तसेच, कामगार सुरक्षा कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी आमदारांचा अभ्यासगट स्थापन करण्याचे आणि चंद्रपूरमध्ये अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्याचे आश्वासनही सरकारला द्यावे लागले.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या युवकांसाठी दिलासा, मुनगंटीवारांच्या मागणीनंतर एमआयडीसीमार्फत स्किल सेंटरची घोषणा

बल्लारपूरचे ‘झायलरियम’ : पर्यटन आणि विज्ञानाचा संगम

बल्लारपूर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘टिम्बर म्युझियम-झायलरियम’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात प्रभावी मांडणी केली. वनसंपदेचा इतिहास, लाकूड उद्योगाचे विज्ञान आणि पर्यावरणीय जागरूकता यांचे दर्शन घडवणारे हे संग्रहालय जिल्ह्यासाठी किती आवश्यक आहे, हे त्यांनी पटवून दिले. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा केली. या उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्याला पर्यटन आणि संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक ओळख मिळणार आहे.

Sudhir Mungantiwar : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या !

नव्या पिढीसाठी आदर्श कार्यशैली

विधानसभेत एखादा मुद्दा कसा मांडायचा, त्याची मांडणी कशी असावी आणि त्यातून सरकारकडून ठोस निर्णय कसा पदरात पाडून घ्यायचा, याचे उत्तम कौशल्य आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे. म्हणूनच अनेक तरुण आमदार त्यांना आपला आदर्श मानतात. सत्तेच्या राजकारणात न रमता, संसदीय प्रक्रियेला जनसेवेचे शस्त्र बनवणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख अधिक गडद झाली आहे. अनुभव, व्यासंग आणि संसदीय परंपरांची जाण यांचा त्रिवेणी संगम असलेल्या आ.मुनगंटीवार यांच्या शैलीमुळेच विधानसभेचे मैदान आजही त्यांच्या अभ्यासू मांडणीने गाजताना दिसते.