balasaheb-hingnikar-joins-bjp-setback-to-congress-daryapur : दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही प्रवेश
Amravati दर्यापूर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अमरावती जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे तसेच प्रभुदास भिलावेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथे हा प्रवेश सोहळा पार पडला.
हिंगणीकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत दर्यापूर तालुक्यात राजकीय चर्चा रंगल्या होत्या. अखेर अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याशी असलेले जुने राजकीय संबंध व कामाचा अनुभव लक्षात घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे हिंगणीकर यांनी यावेळी सांगितले.
District hospitals : जिल्हा रुग्णालयातील एमआरआय युनिट बंद; रुग्णांची धावपळ
या प्रवेशावेळी दर्यापूर तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना तसेच विविध संघटनांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. नितीन देशमुख, श्याम देशमुख, अजय बद्रिया, मुकुंदर नागे, पंकज देशमुख, यशवंत खामरे, अमोल गावंडे, संजय देशमुख, भूषण जंगले, श्रीप्रकाश देशमुख आणि गणेश देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे भाजपची वाट धरली.
हिंगणीकर यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या प्रवेशामुळे दर्यापूर तालुक्यात गावपातळीवर भाजपची ताकद वाढणार असून, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला याचा राजकीय फायदा होण्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे.








