Nagpur municipal corporation : चालते व्हा…भाजपचा पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीला अल्टिमेटम

Nmc-warns-ocw-for-cancelling-contract : करारामधील 50 टक्के काम देखील झालेले नाही

Nagpur शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी भाजपने आणलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीला (ओसीडब्ल्यू) महापौर नीता ठाकरे यांनी १५ दिवसांचा अल्टिमेटम आज दिला. हे बघता आता ओसीडब्ल्यूला नागपूर महापालिकेतून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे दिसून येते.

शहराचा स्वच्छ, शुद्ध आणि चोवीस तास पाणी पुरवठा व्हावा यासाठी नागपूर महापालिकेने २०१२ साली ओसीडब्ल्यू कंपनीला कंत्राट दिले होते. महापालिका आणि कंपनी यांच्यात झालेल्या पाच वर्षांच्या करारात शहरातील सर्व जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलायच्या होत्या. पाण्याची गळती आणि चोरी रोखायची होती. या सोबतच पाणी वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत मीटर लावून द्यायचे होते. आज सुमारे १४ वर्षांचा कार्यकाळ उलटून गेला. एकदा मुदतवाढ देऊनही करारांपैकी ५० टक्केसुद्धा कामे कंपनीला पूर्ण करता आली नाही. त्यामुळे नगरसेवकांचा प्रचंड रोष होता.

Zilla Parishad Election : राजवाडा सजला, ‘राजा’ची प्रतीक्षा! निवडणुकीचं काही ठरेना

नागपूर महापालिकेच्या सभेत भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी ओसीडब्ल्यू कंपनीच्या तक्रारी केल्या. अनेक भागात आजही टँकरने तर काही भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा सुरू असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे यांनी हा विषय सभागृहात माडंला. महापालिका प्रशासकाचा काळात ओसीडब्ल्यूने अनेक ग्राहकांना पाच पट अधिक रकमेचे देयके पाठवली. पाण्याचे मीटर हवने फिरतात. त्याचे आम्ही पैसे द्यायचे का असा खडा सवाल केला. जादाच्या रकमेची देयके पाठवल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. मात्र ते परत घेण्यात आले नाही. कंपनीला फक्त १० टक्के दंड ठोठावला.

मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तो कापून घेतला नाही तर स्थगिती ठेवला. कंपनीने रिडिंगसाठी स्मल भागात घराच्या बाहेर मीटर लावण्याची सक्ती केली होती. त्यामुळे मीटर चोरीला जात आहे. पुन्हा लावण्यासाठी पैसे मागितले जातात. रिडिंगसाठी खाजगी कर्मचारी नेमले आहेत. ते रिडिंग घेतच नाही. सरासरी देयके पाठवतात. असेच करणार असेल पांढरा हत्ती कशाला पोसायचा असा प्रश्न त्यांनी मांडला.

Unseasonal rain : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा राज्यभर कहर, शेतकरी चिंतेत

भाजपचे नगरसेवक मनोज साबळे यांनी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घरातील मीटर कंपनीने कापले, त्यांना पाण्यापासून वंचित ठेवले असा असा आरोप केला. काँग्रेसचे नगरसेवक अभिजित झा यांनी वारंवार शट डाऊन असल्याचे सांगून पाणी पुरवठा केला जात नसल्याचे सांगितले. ही कंपनी ग्राहकांची संघटित लूट करीत असल्याचा आरोप केला.

उद्धव ठाकरे सेनेचे गटनेते किशोर कुमेरिया यांनी या कंपनीच्या मनमानीमुळे अनेक नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे निदर्शनास आणून दिले. विरोधीपक्ष नेते संजय महाकाळकर यांनी कच्चा पाण्यापासून तर वितरित होणाऱ्या पाण्याचा हिशेबच सभागृहाला सांगितले. एवढे सारे करून जनतेचे समाधान होत नसेल आणि महापालिकेला दरवर्षी ७८ कोटी रुपयांचा तोटा होत असेल तर अशा कंपनीचा काय फायदा अशी विचारणा केली.

Raj thackeray : सरकारने तुम्हाला इन्स्टाग्राममध्ये अडकवून ठेवलेय, राज ठाकरेंचा हल्लाबोल

सर्व नगरसेवकांच्या तक्रारीच गंभीर दखल घेत महापौर नीता ठाकरे यांनी सर्व तक्रारी दूर करण्यासाठी १५ दिवसांचा वेळ दिला. त्यानंतर कंपनीचे म्हणणे ऐकून घेणार नाही, आम्हाला जबाबदारीतून मुक्त करावे लागले असा कडक इशारा दिला. एवढे सारे होत असताना गप्प बसून महापालिकेऐवजी कंपनीचे हित जोपासणाऱ्या महापालिकेच्या अधिकऱ्यांवरसुद्धा कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर ठाकरे यांनी आयुक्तांना दिले.