व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Property tax hike : करवाढीच्या सुनावणीत ‘थकबाकी’चा बॉम्ब; मलकापूर न.प.समोर आर्थिक संकट

Property tax hike : करवाढीच्या सुनावणीत ‘थकबाकी’चा बॉम्ब; मलकापूर न.प.समोर आर्थिक संकट

property tax hike hearing in malkapur municipal council : मलकापूरात करवाढीची सुनावणी सुरू; राजकीय दबावात थकबाकीचा जुना वाद पुन्हा पेटला

Malkapur मलकापूर नगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणीवरील आक्षेपांवर अखेर सुनावणीला सुरुवात झाल्याने शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. फायलींची वाढलेली हालचाल, आकडेवारीची जुळवाजुळव आणि नागरिकांच्या हरकतींची छाननी यामुळे नगरपालिका सध्या पूर्णपणे “अॅक्टिव्ह मोड”मध्ये दिसत असली, तरी या सुनावणीसोबतच थकीत मालमत्ता कराचा सहा वर्षांचा जुना मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांपासून शहरातील मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकीत असून, त्याचा थेट परिणाम नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. विकासकामांसाठी निधी उभारणी, दैनंदिन सेवा आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीवर या थकबाकीचा गंभीर परिणाम होत आहे.

Sudhir Mungatiwar : मुनगंटीवारांच्या ‘मेगा भरती’ने जोरगेवार हादरले; कार्यकर्त्यांचा थेट निशाणा!

 

याच काळात करवाढीचा प्रश्न शहरात मोठ्या प्रमाणात गाजला होता. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी नागरिकांची बाजू घेत प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या वेळी अपेक्षित दिलासा न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना आजही कायम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्याची सुनावणी ही केवळ कर दरांपुरती मर्यादित नसून प्रशासनाच्या निर्णयक्षमतेची आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावाचीही कसोटी मानली जात आहे.

Sudhir Mungatiwar : मुनगंटीवारांच्या ‘मेगा भरती’ने जोरगेवार हादरले; कार्यकर्त्यांचा थेट निशाणा!

 

नागरिकांकडून या सुनावणीत कर रचनेतील त्रुटी, वाढीव दर, चुकीचे मूल्यांकन आणि अन्यायकारक कर आकारणी यावर पुन्हा एकदा जोरदार हरकती नोंदविण्याची तयारी सुरू आहे. विशेषतः व्यापारी, व्यावसायिक आणि मालमत्ता धारकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून, “करवाढ आधी की थकबाकी वसुली आधी?” हा प्रश्न चर्चेत आला आहे.

error: Content is protected !!