Chandrashekhar bawankule: आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये!

Two collectorate offices in big districts : महसूल मंत्री बावनकुळे यांच्या प्रशासनाला सूचना

Nagpur महसूल प्रशासन अधिक गतिमान व्हावे यासाठी राज्यातील सर्व मोठया जिल्ह्यांत संपूर्ण आस्थापनेसह दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा, अशी स्पष्ट सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्या आहेत.

मागच्या आठवड्यात पुणे येथील विभागीय आयुक्तालयात महसूल मंत्र्यांनी पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारीपदाची गरज असल्याचे सांगितले. चर्चेनंतर, मोठया जिल्ह्यांचे आकारमान, कामकाज, गरज, महसूल व कार्यपद्धती लक्षात ही पदे तातडीने निर्माण करण्याचे सांगीतले. गुरुवारी बावनकुळे यांनी नागपूर येथील एका बैठकीनंतर सर्व विभागीय आयुक्तांना दूरध्वनीवर संपर्क साधून या पदांचे प्रस्ताव तातडीने तयार करावेत अशी सूचना केली.

Nitin Gadkari : गडकरींच्या अल्टिमेटमची मुदत संपली; मात्र धावपट्टीचे काम अपूर्णच

विभागीय आयुक्तांशी बोलताना महसूल मंत्री म्हणाले की, शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना या सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आहेत. जोपर्यंत प्रत्येक आदिवासी पाडे, वस्ती येथील वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणार नाहीत तोपर्यंत शासकीय योजनांनाही अर्थ उरणार नाही. उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी महसूल यंत्रणा, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग यांनी जबाबदारीने अशा वस्त्यांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

Pankaj Bhoyar : मुंबई बँकेच्या सहकार संकुलासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद !

महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा तत्काळ निपटारा व्हावा. तसेच सुनावणीसाठी जी प्रकरणे आहेत त्यावर योग्य कारवाई व्हावी. या दृष्टीने जिल्ह्यामध्ये २ अपर जिल्हाधिकारी कार्यालये संपूर्ण आस्थापनेसह कार्यान्वित करण्याबाबात प्रस्ताव सादर करा, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.