Nagpur Metro : प्रेमी युगलांचा मोर्चा मेट्रोकडे!

608 passengers fined Rs 2 lakh for violating rules : नियम मोडणाऱ्या ६०८ प्रवाशांना दोन लाखांचा दंड

Metro Management : मेट्रो स्थानकावर कसे वागायचे, यासाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांना महामेट्रोकडून दंड ठोठावण्यात आला आहे. कुणी मेट्रोचा ट्रॅक ओलांडताना आढळले. तर कुणी स्थानकावरच चाळे करीत होते. मेट्रोच्या परिसरात थुंकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. मेट्रोच्या लिफ्टपासून ते सर्वच परिसरात सीसीटीव्ही असल्याने प्रवाशांनी वागणूक योग्य ठेवावी, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले.

शहरातील उद्यानांमध्ये होत असलेल्या अशा गैरप्रकारांवर पोलिसांची खास नजर असते. त्यामुळे या प्रेमी युगुलांनी आपला मोर्चा सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मेट्रोकडे वळविला आहे. मात्र मेट्रोच्या कडेकोट सुरक्षा यंत्रणेत असे गैरप्रकार उघडकीस येत असून त्यांच्यावर कारवाईही सुरू झाली आहे.

Mobile tower : देवळीत ‘टॉवर पे टॉवर’, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

गेल्या वर्षभरात मेट्रो प्रशासनाने ६०८ प्रवाशांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख ९१ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. स्थानकावर उपद्रव करण्याच्या नावाखाली हा दंड आकारण्यात आला. यात कुणी मेट्रोची रूळ ओलांडून जात असतानाही आढळून आले. याचबरोबर परिसरात थुंकणाऱ्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागले, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

असा आकारला जातो दंड
स्थानकावरील उपद्रव करणे : प्रत्येकी ५०० रुपये
ट्रॅक परिसरात थुंकणे : प्रत्येकी २००
मेट्रोचा रूळ ओलांडणे : प्रत्येकी ५००

Vehicle collision : वाहनाची धडक; वाघिणीचे चार महिन्यांचे शावक ठार

असे प्रकार करू नका
-आपत्कालीन परिस्थिती असल्याशिवाय अलार्म वापरू नका
-मेट्रेचे दरवाजे किंवा दरवाजाच्या काठावर हात ठेवू नका
-मेट्रोत किंवा स्थानकावर म्युझिक स्पीकर वाजवू नका
-मेट्रोच्या दारांना टेकू नका
-मेट्रोत प्रवास करताना मोठ्याने बोलू नका
-मेट्रोत खाली बसू नका
-कुठेली लिहू नका
-प्रवास करताना काही खाऊ नका
-सहप्रवाशांना प्रवास होईल अशा जड वस्तू नेऊ नका
-स्थानकावर धुम्रपान करू नका
-मेट्रोचे दरवाजे जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करू नका
-मेट्रो स्थानक किंवा मेट्रोच्या आत पोस्टर लावू नका
-मेट्रोच्या सिटवर पाय पसरून बसू नका किंवा दुमडून बसू नका