Breaking

Promotion of industries : जिल्ह्यात उद्योगांना चालना, गतवर्षात उद्योग वाढले !

 

Youth participated and started 160 startup businesses : तरुणांनी सहभागी होत १६० स्टार्टअप उद्योग सुरू केले

Wardha : जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत २०२४ मध्ये स्टार्टअप उद्योगांना चालना मिळाली आहे. विविध तालुक्यांतील तरुणांनी यात सहभागी होत १६० स्टार्टअप उद्योग सुरू केले आहेत. यातून ७ कोटी ४९ लाख रुपयांची गुंतवणूक झाली आहे, तर यात सहभागी झालेल्या नवउद्योजकांना या योजनेच्या माध्यमातून अनुदानही मिळाले आहे.

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग येण्यास तयार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना तरुण, नवउद्योजकांनी मात्र, स्टार्टअप उद्योगांची कास धरली आहे. छोट्या – मोठ्या व्यवसाय, उद्योगांच्या माध्यमातून सक्षम होण्याचा प्रयत्न तरुण उद्योजक करत आहे. सध्या जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतीत विस्तारासाठी जागेची अडचण आहे.

Female wrestlers : राज्यभरातील २०० महिला पहेलवानांमध्ये झुंज सुरू !

ज्या भागात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे, तेथे दळणवळण, पाणी आदी सुविध उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत मोठा उद्योग आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरुण, नव उद्योजकांनी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण घेऊन आपला स्टार्टअप उद्योग सुरू करून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

Psychiatric center : विनापरवानगीने सुरू होते निवासी मानसोपचार केंद्र !

या स्टार्टअपच्या माध्यमातून ७ कोटी ४९ लाख रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे या स्टार्टअपच्या माध्यमातून जिल्ह्यात छोट्या, मोठ्या उद्योगांना चालना मिळाली आहे, यातून रोजगार निर्मितीलाही चालना मिळाली आहे. याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसणार आहेत.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गतवर्षी जिल्हा उद्योग केंद्राला ६०० उद्योग सुरू करण्याचे टार्गेट होते. आतापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राने १६० उद्योगांना मान्यता दिली आहे. कुटीर उद्योगाला चालना देण्यासाठीही जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रयत्न होत आहेत. घरगुती शेती उत्पन्न व शेती प्रक्रिया उद्योगांचा यात समावेश आहे.