Appeal to quickly reach the public with government initiatives : शासनाचे उपक्रम गतीने जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन
Khamgaon: राज्यातील दिन-दलित, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि नोकरदार, अशा सर्व स्तरातील लोकांना शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ गतीने पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले.
महसूल विभागाच्यावतीने तहसीलच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात विविध योजनांचा लाभ वितरण करण्यात आला. तसेच राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना लॅपटॉप व प्रिंटर संचाचे वितरण करण्यात आले
Collector Dr. Kiran Patil : कर्मचाऱ्यांनी खेळ आणि कलागुण सादर करून जिल्ह्याचे नाव
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभ वितरित करण्यात आले. महाज्योती योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टॅब्लेटचे वितरण करण्यात आले. गायन व वादविवाद स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
मतदार व मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत मंत्री फुंडकर यांनी मतदानाचे कर्तव्य निभावण्याचे आवाहन केले.
जनतेस उत्तम सेवा द्या
विद्यार्थ्यांनी टॅब्लेटचा वापर स्वतःचे कॅरिअर घडविण्यासाठी करावा. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी संगणक संचाचा उपयोग जनतेस उत्तम सेवा देण्यासाठी करावा. मतदानाचा अधिकार महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीने मतदान करून शासन प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आकाश फुंडकर यांनी केले.
Contaminated water : दूषित पाण्याचा धोका; आरोग्य विभागाचा पाणी न वापरण्याचा सल्ला
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. महाविद्यालयीन व शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
तहसीलदारांचा सत्कार
मंत्री आकाश फुंडकर यांचा तहसीलदार सुनील पाटील व उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उपविभागीय अधिकारी डॉ. पुरी यांनी महात्मा गांधी सभागृह वातानुकूलित करण्याची मागणी केली