Breaking

Minister of State Indranil Naik : प्रत्येकाने वाचावे भारताचे संविधान

Everyone should read Indian Constitution : राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे प्रजासत्ताकदिनी आवाहन

Amravati भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना घटनात्मक अधिकार प्रदान केले आहेत. संविधान प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे संविधानाचे प्रत्येकाने वाचन करावे, असे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.

जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नाईक म्हणाले, ‘स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपला देश स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतीय संविधान देशाला अमूल्य देणगी मिळाली. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाचे वाचन करणे महत्त्वाचे आहे. संविधानाचा आदर राखून राज्य शासन विविध घटकांसाठी काम करत आहे.’

Archaeological Department of Maharashtra : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं येणार नागपुरात

शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य दरात बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यात येत आहेत. केवळ एक रुपयात विमा योजनाही सुरू करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी 1,464 कोटी रुपये, तर रब्बी हंगामासाठी 148 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 840 एकर शासकीय जमिनीवर सौर प्रकल्प उभारले जात आहेत. यातून 184 मेगावॅट उत्पादन क्षमता असलेले प्रकल्प सुरू होत आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेअंतर्गत 78,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला.

Chandrashekhar Bawankule : समूहिक प्रयत्नांतूनच महाराष्ट्राचा चौफेर विकास

महिलांसाठी बचतगटांच्या माध्यमातून स्वयंपूर्णता साधण्यावर भर दिला जात आहे. 600 महिलांना अनुदानावर पिंक ई-रिक्षा दिली जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ 7 लाख महिलांना मिळत आहे, असंही ते म्हणाले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी मान्यवर उपस्थित होते.