नागपूर
Searching for a wife online cost 30 lakh rupees : बीटकॉईनमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले
Nagpur लग्नासाठी ऑनलाईन वधू-वर सूचक संकेतस्थळावरुन बायको शोधणे एका अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. त्या अधिकाऱ्याला वधूबाबत माहिती देण्याचे आमिष दाखवून 30 लाखांचा गंडा घालण्यात आला. या घटनेमुळे लग्न जुळवून देणाऱ्या संकेतस्थळांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कमलेश नावाचे अधिकारी एका कंपनीत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ते रामदासपेठच्या Ramdaspeth Nagpur उच्चभ्रू भागात राहतात. काही काळापासून त्याचे कुटुंबीय लग्नासाठी प्रयत्न करत होते. वधू शोधण्यासाठी त्यांनी ‘संगम डॉट कॉम’ या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. 26 मार्च 2024 रोजी टीना रावत नावाच्या तरुणीने कमलेशला संपर्क केला. तिने लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली.
24 Hrs Electricity for Farmers : शेतकऱ्यांनो आता भारनियमन विसरा; कृषीला 24 तास वीज
टीना हरयाणातील Haryana गुडगाव Gurgaon येथील रहिवासी असल्याचे सांगितले. 44-7551000846 या व्हॉट्सअप क्रमांकावरून तिने त्यांच्याशी ‘चॅटिंग’ला सुरुवात केली. तीन वर्षांपासून आपण बिटकॉईन ट्रेडिंगमध्ये Bitcoin Trading काम करत असल्याचे तिने कमलेशला सांगितले. यात गुंतवणूक केल्यावर मोठा नफा मिळतो असा दावा तिने केला. याबाबत कमलेशने विचारणा केली असता बायगेटकॉईन डॉट ओआरजी या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास सांगितले.
कमीत कमी 30 हजार अमेरिकन डॉलर्सची American Dollars गुंतवणूक करावी लागेल असे तिने कमलेशला सांगितले. पैसे कमी असतील तर उधार देण्याचीदेखील तयारी दर्शविली. त्यांनी 3 लाखांची गुंतवणूक केली असता त्याला ५० हजारांचा नफादेखील मिळाला. कमलेशला ते पैसे काढतादेखील आले. ऑक्टोबरपर्यंत कमलेशने 30.91 लाख रुपये संबंधित संकेतस्थळाच्या प्रतिनिधींनी सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले.
मात्र त्यानंतर पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता 2 टक्के कर भरावा लागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर समोरील व्यक्तीने बँक ऑफ अमेरिकेत खाते उघडून 5998 डॉलर्स जमा करावे लागतील असे सांगितले. यावरून कमलेशला संशय आला. त्यांनी टीना रावतला संपर्क केला असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.