Bolero collides with two-wheeler, mother and two children killed : नवेगावबांधजवळील घटना : पती गंभीर जखमी
Navegaobandh येथे भरधाव बोलेरोने दुचाकीला दिलेल्या धडकेत आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीचालक पती गंभीर जखमी झाला. चितेश्वरी संदीप पंधरे (२६) संचित संदीप पंधरे (५ महिने) व पार्थिवी रोहित सिडाम (३) (सर्व रा. येरंडी, ता.अर्जुनी मोरगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर दुचाकीचालक संदीप पंधरे हे गंभीर जखमी आहेत.
संदीप पंधरे हे रविवारी (दि.२६) दुपारी पत्नी, मुलगा व शेजारील चिमुकली पार्थिवी यांच्यासह आपल्या दुचाकी (एमएच ३५, एएम २७५६) ने येरंडीहून नवेगावबांध येथे पर्यटनासाठी जात होते. दरम्यान, नवेगावबांधजवळ त्यांच्या दुचाकीला मागेहून बोलेरोने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील चितेश्वरी पंधरे, संचित संदीप पंधरे व पार्थिवी रोहित सिडाम यांचा जागीच मृत्यू झाला. संदीप पंधरे हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर बोलेरो चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी या घटनेची माहिती नवेगावबांध पोलिस स्टेशनच्या ठाणेदार योगिता चाफले यांना दिली. माहिती मिळताच त्या चमूसह घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी संदीप पंधरे यांना ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात रेफर केले. याप्रकरणी नवेगावबांध पोलिसांनी बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
संदीप पंधरे हे पत्नी चितेश्वरी, पाच महिन्याचा चिमुकला संचित व शेजारील चिमुकली पार्थिवी यांना घेऊन रविवारी (दि.२६) जवळील नवेगावबांध येथे पर्यटनासाठी निघाले होते. नवेगावबांध येथे जाण्यासाठी शेजारीला चिमुकली पार्थिवी हिने सोबत येण्याचा हट्ट केल्याने तिला घेवून दुचाकीने निघाले. मात्र नवेगावबांधपासून काही अंतरावरच भरधाव बोलेरोने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने चितेश्वरी व दोन चिमुकल्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यामुळे पर्यटनाच्या आनंदावर दु:खाचा डोंगर कोसळला.
Minister Ashok Uike : कचारगड यात्रेच्या नियोजनात कुठलीच कसर नको!
अपघात संतोष पंधरे यांचा पाच महिन्यांचा चिमुकला संचितचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पाच महिन्यांपूर्वी त्याच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा करण्यात आला. तर संचितला समजायला लागण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने वार केला. या अपघातात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने पंधरे, सिडाम कुटुंबीयासह संपूर्ण येरंडीवासीय सुद्धा हळहळले.