Breaking

Illegal sale of biodiesel : मुंबई दक्षता पथकाची मलकापुरात मोठी कारवाई

 

Mumbai vigilance team big action in Malkapur : अवैध बायोडिझेल विक्री प्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल; ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Khamgao राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल विक्रीवर मुंबई येथील दक्षता पथकाने धडक कारवाई केल्याने खळबळ उडाली. महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या धाडीत दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये १४ आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मलकापूर परिसरात गेल्या काही वर्षांपासून बायोडिझेलची अवैध विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. यापूर्वी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने यावर कारवाई केली होती. ही कारवाई नंतर थंडावली. मात्र, मुंबईच्या दक्षता पथकाने २७ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन ठिकाणी छापे टाकून प्रशासनाला धक्का दिला.

Collector of Buldhana : कारागृहातील कैद्यांना मुलभूत सोयीसुविधा मिळाव्यात

पहिल्या कारवाईत पुरवठा निरीक्षण अधिकारी धनवर्षा श्रीकृष्ण हरणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्र. १५/२०२५ नोंदविण्यात आला. आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ व पेट्रोलियम द्रव्यविषयक आदेश २००५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला. तसेच ३४.६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Sukesh Zanwar : बुलढाणा अर्बनची धुरा नव्या कर्णधाराकडे !

दुसऱ्या कारवाईत नायब तहसीलदार श्रीकृष्ण साहेबराव उगले यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्र. १६/२०२५ दाखल करण्यात आला. यात ७ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३६.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई तालसवाडा बसस्टॉप आणि हॉटेल एकता परिसरात करण्यात आली.

जप्त केलेले २ टँकर दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. ठाणेदार हेमराज कोळी पुढील तपास करीत आहेत. काही आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध बायोडिझेल व्यवसायावर मोठा आघात झाला आहे.