Breaking

Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : उद्धव ठाकरेंची शिवसेना धडकली नगरपरिषदेवर!

Uddhav Thackeray’s ShivSena march on Municipal Council : शहरातील नाल्या तुंबल्या, घाणीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप

Gondia नगरपरिषद क्षेत्रांतर्गत रस्ते तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. पण या रस्त्यांच्या बांधकामाला वर्ष उलटले नाही तोच भूमिगत गटार योजनेकरिता तेच रस्ते फोडले जात आहेत. शहरातील सर्वच वाॅर्डातील नाल्या तुंबल्या आहेत. त्यांची साफसफाई केली जात नाही. कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावली जात नाही आदी समस्यांसाठी बुधवारी (दि. २९) उद्धवसेनेेने नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढला.

शहरातील रस्ते निर्माणाकरिता नगरपरिषदेला १५ ते २० कोटी रुपये आले आहेत. रस्त्याचे कामही सुरू आहेत. सोबतच भुयार गटार योजनेचीही कामे सुरू आहेत. त्यामुळे त्याच रस्त्यांना भुयार गटारकरिता फोडले जात आहे. यात शासनाच्या निधीचा दुरुपयोग होत आहे. नगरपरिषदेचे शहरातील नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष करीत आहे. कचरा वेळेत उचलला जात नाही. त्यामुळे शहरात घाणीचे वातावरण प्रत्येक वाॅर्डात आहे. नगरपालिकेच्या शाळा जीर्ण अवस्थेत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तरीही प्रशासकीय यंत्रणेचे शाळा दुरुस्तीकडे लक्ष नाही.

Electric towers in Farm Field : आधी मोबदला द्या, नंतरच दुरुस्तीच्या कामाला हात लावा!

नगरपालिका क्षेत्रात कोट्यवधी रुपये खर्च करून कट पाइपलाइन, पंप हाउस, बोअरवेल लावण्यात आले. परंतु निम्म्यापेक्षा अधिक पंप बंद अवस्थेत आहेत. रेल्वे सरकारी तलावाचे अमृत योजनेंतर्गत साैंदर्यीकरण तसेच स्वच्छता करण्याचे काम अपेक्षित होते; परंतु याबाबत आजवर काहीही कार्य झाले नाही. याकडे नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी केले. मोर्चात शिवसैनिक व शहरातील नागरिक सहभागी झाले होते.

नगरपालिका क्षेत्रात कचरा गोळा करण्याकरिता डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था नाही. त्यामुळे कचऱ्याची आणि दुर्गंधीची समस्या दिवसेंदिवस बिकट रूप धारण करीत आहेत. नगरपरिषद यावर कोणताही तोडगा काढायला तयार नाही, अशा अनेक समस्यांकडे उद्धवसेनेने मोर्चा काढून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा महसूल अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

ठाकरे गट आक्रमक
उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक पश्चिम विदर्भात आक्रमक झालेले दिसत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये लालपरीच्या भाडेवाढीच्या विरोधात तर काही ठिकाणी शेतकऱ्यांसाठी शिवसैनिक आंदोलन करताना दिसत आहेत. आता गोंदियात स्थानिक समस्यांवरून आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.