Breaking

Entry of new leaders in Shivsena Shinde faction : पश्चिम विदर्भातील राजकीय समीकरणांमध्ये बदल

 

Changes in the political equations of West Vidarbha : शिवसेना शिंदे गटात नव्या नेत्यांचा प्रवेश

Akola महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि संपर्क नेते गोपिकिशन बाजोरिया व माजी आमदार विप्लव बाजोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात नव्या नेत्यांचा जाहीर प्रवेश पार पडला. यावेळी चंद्रशेखर पांडे गुरुजी (माजी सभापती, जिल्हा परिषद, अकोला) आणि बाळू पाटील तायडे (माजी जिल्हा परिषद सदस्य व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पातूर) यांनी अधिकृतरित्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

या प्रवेशामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल तसेच पश्चिम विदर्भातील राजकीय समीकरणांवर याचा महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रवेश सोहळ्यादरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. नव्या नेतृत्वाच्या सहभागामुळे स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

Loans for Micro and Small Enterprises : अन्नप्रक्रिया उद्योगाकडे नवउद्योजकांचा कल

चंद्रशेखर पांडे गुरुजी हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी नेते आणि अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती राहिले आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात शैक्षणिक विकासावर विशेष भर दिला होता. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Forest Department : १६ पाणवठ्यांवर हिवाळी पाणपक्षी प्रगणना!

शिवसेना शिंदे गटात अनुभवी नेते सामील होत असल्याने पक्षाचे संघटन अधिक मजबूत होण्याची शक्यता असून, यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी एकसंध शिवसेनेत असलेले चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी शिवसेनेला रामराम करीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले होते. तेथेही रमले नाही. अखेर त्यांनी भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वी सोडचिठ्ठी दिली.

त्यानंतर ते शिवसेना ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, त्यांनी शिंदे गटाचा धनुष्यबान हाती घेतला आहे. यापूर्वी शिवसेना ठाकरे गटातील जिल्हा संघटक विजय दुतोंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.