40 women rescued : नवी मुंबईतील ‘द रेस’ वर मोठी कारवाई !

Major action taken against The Race Dance Bar in Vashi, Navi Mumbai : बेकायदेशीर व अनैतिक कृत्यांना आळा घालणार

Mumbai : नवी मुंबईच्या वाशी येथे द रेस नावाचा डान्स बार रात्री १२ वाजल्यानंतरही सुरू होता. त्यावेळी पोलिसांनी तेथे छापा घालत मोठी कारवाई केली. हा बार विनापरवानगी सुरू होता. म्युझिक सिस्टीमच्या कर्णकर्कश आवाजात काही महिला अत्यंत अश्लील पोशाखात ग्राहकांसमोर अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

केंद्रीय गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्पष्ट निर्देशानुसार पोलिस प्रशासनाने ही मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान ४० महिलांची सुटका करण्यात आली. याशिवाय ६ बार वेटर यांच्यासह एकुण ४६ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बार मालक, व्यवस्थापक आणि इतर संबंधित लोकांवर अनधिकृत व्यवसाय, अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणे आणि महिलांच्या प्रतिष्ठेचा भंग करणारे वर्तन यासाठी विविध कायद्यांअतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Congress leaders : सोम्या गोम्यांच्या पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही !

ही कारवाई राज्य शासनाच्या अश्लीलतेवर कठोर प्रतिबंध घालण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. समाजातील नैतिक मुल्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पावले उचलण्यात येत आहेत. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि प्रभावी कार्यपद्धतीमुळे अशा बेकायदेशीर व अनैतिक कृत्यांवर आळा बसण्यास निश्चितच मदत होणार आहे. राज्य सरकारने हाती घेतलेली ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.