Lalpari is getting hit by rent hike : लालपरी अडचणीत; दरवाढीचा फटका बसतोय
Yavatmal एकीकडे उत्पन्नाचे वांधे त्यात दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई या सर्वांमुळे त्रस्त असलेली सामान्य जनता एसटी दरवाढीने पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. सर्वसामान्यांची ही लालपरी आजही महाराष्ट्रात्त्या अनेक भागात दळण वळणाचे प्रमुख साधन आहे. मात्र आता झालेल्या भाडेवाढमुळे अनेकजण दुचाकीच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत. एसटी भाड्याच्या दरात अनेक ठिकाणी दुचाकीचा प्रवास होत आहे.
मात्र हा नागरिकांना धोक्याचा असल्याने एकीकडे खिशाला बसणारी झळ तर दुसरीकड जीव मुठीत घेवून दुचाकीवर नाईलाजास्तव करावा लागणारा प्रवास असे चित्र अनेकभागात पाहायला मिळत आहे. एसटीची दरवाढ मोठ्या प्रमाणावर झाली.
Mahayuti Government : सुंदर बसस्थानकाला मिळेल ३ कोटीचे बक्षीस!
यवतमाळ ते राळेगाव एका प्रवाशाचे भाडे ८१ रूपये आहे. दोघांनी ये-जा केल्यास ३२४ रूपये भाडे खर्च करावे लागतात याच तुलनेत एका दुचाकीने दोघे गेल्यास दोन लिटर पेट्रोलमध्ये म्हणजेच २१० रुपयात कमी खर्चात हा प्रवास होत आहे. याचप्रकारे यवतमाळ ते नेर भाड़े ६१ रुपये आहे. दोघांनी प्रवास करणे म्हटले म्हणजे ते भाडे २४४ रुपये खर्च करावे लागतात. या तुलनेत दोघांनी दुचाकीने यवतमाळ- नेर-येजा केल्यास दीड ते पावणेदोन लिटर पेट्रोल म्हणजेच १५० ते १७५ रूपयांमध्ये हा प्रवास होतो.
DPC Akola : अतिरिक्त निधीच्या मागणीला अजितदादा प्रतिसाद देतील?
यवतमाळ ते दिग्रस बसभाडे आता १२२ रुपयापर्यंत पोहचले आहे. दोघांचा यवतमाळ ते दिग्रस प्रवास ये-जा करण्यासाठी ४८८ रूपये खर्च करावे लागतात. याच तुलनेत दुचाकीने प्रवास केल्यास ३ लिटर पेट्रोल म्हणजेच ३१५ ते ३५० रूपयात कमी खर्चात हा प्रवास होत आहे. तर यवतमाळ नागपूर हे अंतर १५२ कि. मी राष्ट्रीय महामार्गाने दर्जेदार रस्ता, यामुळे हा जान्या वेण्याचा प्रवास एसटीने दोघांनी केल्यास त्यांना १००८ रूपये खर्च करावे लागतात.
तोच दुचाकीने हा प्रवास केल्यास ७००ते ८०० ते रुपयांच्या दरम्यानच खर्च होत आहे. यवतमाळ येथून अमरावतीला जाणाऱ्याऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्याशी चर्चा केली असता यवतमाळ ते अमरावती अंतर हे ९३ म्हणजेच येणे-जाणे १८६ कि. मी. दुचाकीला ४ साडेचार लिटर पेट्रोल पकडले तरी ४५० रूपयाच्यावर खर्च नाही. तोच प्रवास जर बसने दोघांनी केल्यास ६४८ रूपयांच्या वर भूर्वड पडत आहे.
यामुळे बचतीसाठी, खर्च कमी व्हावा यासाठी अनेकांनी एसटी प्रवासापेक्षा दुचाकीचा प्रवास बरा असा सूर आठळला असलातरी नागरिकांसाठी हा नाईलाजास्तव करावा लागणारा प्रवास असुरक्षिततेचा आहे, एवढे मात्र खरे.