Breaking

Amravati MIDC : एमआयडीसीतील तो कर्मचारी कुणासाठी घेत होता लाच?

MIDC employee caught red-handed while taking bribe : एसीबी करणार तपास, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संशयाच्या भौऱ्यात

Amravati शहरातील प्रादेशिक एमआयडीसी कार्यालयात कार्यरत वर्ग-३ च्या कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. मंगळवारी दुपारी ४ वाजता ही कारवाई करण्यात आली. मोतीराम माणिकराव ढोरे (४२) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

एमआयडीसी परिसरातील सरेंडर प्लॉटची रक्कम मिळवून देण्यासाठी त्याने २५ हजार रुपयांची मागणी केली होती. वर्ग तीनचा हा कर्मचारी कुणासाठी लाच स्वीकारत होता याबाबत एसीबीने तपास सुरू केला असून, एमआयडीसीचे वादग्रस्त प्रादेशिक अधिकारी या कारवाईमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

Commissioner of Nagpur Municipal Corporation : आयुक्तांनी घेतली धास्ती! उन्हाळ्यापूर्वीच सुरू होणार नद्यांची सफाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या बहिणीच्या नावावर एमआयडीसी नांदगाव पेठ येथे एक प्लॉट होता. वडिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी पैशाची तातडीची गरज असल्याने त्यांनी हा प्लॉट सरेंडर केला. या व्यवहारासाठी मिळणाऱ्या ९.३० लाख रुपयांची रक्कम लवकर मिळवून देण्यासाठी सहाय्यक कर्मचारी ढोरे यांनी २५ हजारांची लाच मागितली.

तक्रारदार महिलेने ३१ जानेवारी रोजी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. ढोरे यांनी प्रथम ५ हजार रुपये स्वीकारले होते. उर्वरित १० हजार तत्काळ आणण्याची आणि उरलेले १० हजार काम झाल्यावर देण्याची मागणी केली. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोतीराम ढोरे यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलिस उपअधीक्षक मंगेश मोहोड यांच्या मार्गदर्शनात झाली.

Fetus in Fetu : इवल्याशा जीवाच्या पोटात सापडली दोन अर्भके!

सापळा रचणाऱ्या पथकात पोलिस निरीक्षक भारत जाधव, पोलिस निरीक्षक केतन मांजरे, पोलिस निरीक्षक संतोष तागडे, पोलिस हवालदार प्रमोद रायपुरे, पोलिस अंमलदार उपेंद्र चोरात, युवराज राठोड, आशिष जांभोळे, शैलेश कडू, पोलिस उपनिरीक्षक सतीश किटुकले यांचा समावेश आहे.