Gang rape of a minor girl : घटनेने जिल्हा हादरला; आरोपींना अटक
Wardha अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर पाच जणांनी आळीपाळीने सामूहिकपणे अत्याचार केला. ही घटना आर्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. धक्कादायक घटना उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली.
मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजेपासून आर्वी पोलिस ठाण्यासमोर नागरिकांची गर्दी उसळली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलासह चार जणांचा समावेश आहे.
पीडितेला तिचा अल्पवयीन मित्र त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने पीडितेशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तेथे त्याचे चार मित्र आले. त्यांनी पीडितेच्या मित्राला बाहेर पाठविले आणि त्या चौघांनीही आळीपाळीने पीडितेशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
Crime in Nagpur : बलात्काराचा प्रयत्न; महिलांनी झोडपून काढले
त्यानंतर तिच्या मित्राने तिला परत घरी सोडून दिले. रात्री पीडितेची आई कामावरून घरी आल्यानंतर पीडितेने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पाेलिस निरीक्षक सतीश डेहणकर यांनी तत्काळ आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना केले. पोलिस पथकाने अख्खे शहर पालथे घालून पाच जणांना ताब्यात घेतले.
Crime in Nagpur : शिवी दिली म्हणून अल्पवयीन मुलाचा प्राणघातक हल्ला!
यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे समजते. वृत्त लिहिस्तोवर आरोपींचे बयाण नाेंदविणे सुरू होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. संपूर्ण सत्यता पडताळून झाल्यानंतरच आरोपींची नावे आणि इत्थंभूत माहिती देऊ, असे पोलिसांनी सांगितले. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुचिता मांडवाले, गणेश खेडकर करीत आहेत.
आरोपींविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ६४ (१), ७० (२), बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कलम ४, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने संपूर्ण आर्वी तालुक्यातच खळबळ उडाली आहे.