Blast at Asian Fireworks : बाजारगाव परिसरात दीड वर्षात २२ कामगार ठार!

22 workers were killed in Bazargaon area in one and a half years :कामगारांच्या सुरक्षेला तिलांजली, अग्निशमन व्यवस्थाही नाही

Nagpur बाजारगाव परिसरात असलेल्या स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या परिसरात असलेल्या स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये वारंवार स्फोटाच्या घडना घडत आहेत. या कालावधीत विविध स्फोटांमध्ये परिसरातील तब्बल २२ कामगारांना जीव गमवावा लागला आहे.

रविवारी या परिसरात असलेल्या एशियन फायर वर्क्स कंपनीत झालेल्या स्फोटात दोन कामगार ठार झाले. बाजारगाव परिसरात स्फोटके निर्माण करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. यात प्रामुख्याने सोलर एक्सप्लोजिव्ह इंडस्ट्रीज आहे. याशिवाय इकॉनॉमिक्स एक्सप्लोजिव्हज, चामुंडा एक्स्प्लोजिव्हसह सात ते आठ कंपन्या आहेत. एशियन फायर वर्क्स कंपनीचा मालक सोहेल अमिन आहे.

Marathi-Sahitya-Sammelan-Delhi : तोपर्यंत साहित्य संमेलने सरकारच्या गोठ्यात बांधावीच लागतील!

परंतु, यापूर्वी त्यांची या परिसरात एसबीएल नावाची स्फोटक निर्माण करणारी कंपनी होती. ही कंपनी त्यांनी काही वर्षांपूर्वी रायपूरच्या उद्योजकाला विकली. त्यानंतर त्यांनी फटाक्यासाठी वाती तयार करणे व त्याला आवश्यक केमिकल तयार करण्याचा कारखाना सुरू केला. या परिसरातील कंपन्यामध्ये वारंवार स्फोटाच्या घटना घडत आहे. डिसेंबर २०२३ रोजी सोलर एक्सप्लोजिव्हजमध्ये झालेल्या स्फोटात तब्बल ९ कामगार मृत्यूमुखी पडले होते.

सुरक्षा व्यवस्थेला तिलांजली

विशेष म्हणजे या कंपनीत कोणतीही अग्निशमन व्यवस्था नव्हती. एखादा कामगार जखमी झाल्यास त्याला तातडीने उपचार मिळण्यासाठी Ambulance ची सुद्धा या कंपनीमध्ये व्यवस्था नाही. राज्य सरकारच्या कामगार सुरक्षा नियमावलीनुसार अग्निशमन व एम्बुलन्सची व्यवस्था राखणे आवश्यक आहे. तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही.

कोंढाळी येथील ज्येष्ठ पत्रकार दुर्गाप्रसाद पांडे यांच्या म्हणण्यानुसार या परिसरात मोठ्या प्रमाणे स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत. परंतु कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना नाही. यामुळे गेल्या केवळ दीड वर्षात २२ कामगारांना जीव गमवावा लागला आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाकडून या कंपन्यांचे नियमित अंकेक्षण सुद्धा केले जात नाही. केवळ स्फोटाची घटना घडल्यानंतर हे अधिकारी येऊन प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न् केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

Guardian Secretary Saurabh Vijay : दरडोई उत्पन्न वाढीसाठी क्रमवारीत सुधारणा आवश्यक

यापूर्वीच्या घटना

गेल्या १२ ऑगस्ट २०२३ – इकॉनॉमिक्स एक्सप्लोझिव्हमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला,
१७ डिसेंबर २०२३ – सोलर एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीजमध्ये ०९ कामगारांचा मृत्यू झाला,
१३ जून २०२४ – चामुंडा एक्सप्लोझिव्हमध्ये झालेल्या स्फोटात ०९ कामगारांचा मृत्यू झाला