Breaking

Buldhana Jail : कैद्यांची आता नातेवाईकांसोबत ‘ई-भेट’!

Jail inmates will meet their relatives through video conference : व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घरबसल्या भेट घेण्याची सुविधा

कैदी कारागृहात दाखल झाल्यानंतर त्याचा बाहेरील जगाशी व नातेवाईकांशी संपर्क तुटून जातो. पण त्यांना नातेवाईकासोबत संपर्क साधता यावा, यासाठी बुलढाणा कारागृह प्रशासनाने Vertual मार्ग शोधून काढला आहे. कैदी आणि नातेवाईक तसेच कैदी आणि वकील यांच्यात ‘ई-भेट’ घडवून आणण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

घरुनच मोबाईलचा वापर करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घरबसल्या भेट घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. या सुविधेचा लाभ कैद्यांच्या नातेवाईकांनी तसेच वकीलांनी घ्यावा, असे आवाहन कारागृहाचे Buldhana Jail अधीक्षक संदीप भुतेकर यांनी केलेले आहे.

Nitin Gadkari : वेस्ट मटेरियल वापरा; पर्यावरणाचे रक्षण करा !

कारागृहात दाखल झालेल्या कैद्यांसाठी त्यांच्या नातेवाइकांसोबत संपर्क साधण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. कारागृह प्रशासनाकडून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. त्यापैकीच एक म्हणजे ई-मुलाखत सुविधा होय. यामध्ये कैद्यांचे नातेवाईक व वकील यांना कारागृहात प्रत्यक्ष मुलाखत घेता येते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कारागृह विभागानेसुद्धा व्हर्चुअल मार्ग निवडला आहे.

या पद्धतीने घरुनच मोबाईलचा वापर करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कैद्यासोबत बोलणे शक्य झाले आहे. बुलढाणा जिल्हा कारागृहात या सुविधेसाठी दोन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग video conference संच उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार व्हीसी संचांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

यापूर्वी कैद्यांच्या कारागृहातील प्रत्यक्ष मुलाखतीकरीता चार खिडक्या उपलब्ध होत्या. आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नव्याने मुलाखत कक्ष बांधण्यात आलेला आहे. यात 10 खिडक्यांद्वारे कैदी त्यांचे नातेवाईक व वकील यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात. तसेच कारागृह प्रशासनाकडून कैद्यांसाठी दूरध्वनी सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कारागृह परीसरात व मुलाखत नावनोंदणी कक्षाजवळ माहितीफलक लावण्यात आले आहेत. कारागृह अधीक्षकांच्या साप्ताहिक संचार फेरीदरम्यानसुद्धा कैद्यांना या सुविधेची माहिती दिली जात आहे.

Praful Patel : दोन राष्ट्रवादी एकत्र येणे हा कौटुंबिक विषय !

पाकिस्तानी कैद्यांना सुविधा नाही
कैद्यांच्या नातेवाईकांचे व्हेरीफाईड मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. कारागृहात असलेले विदेशी कैदी, कारागृहातील भारतीय कैदी किंवा नातेवाईक विदेशात असणाऱ्या सर्व कैद्यांना या सुविधेचा लाभ मिळतो. सद्यस्थितीत पाकीस्तानी कैद्यांना ही सुविधा लागू करण्यात आलेली नाही.

अशी आहे प्रक्रिया

नातेवाईक व वकील हे NPIP (www.eprisons.nic.in/npip) या पोर्टलवरुन स्वतःची व कैद्याची माहिती नमुद करतात. कारागृहाला व्हीसी भेटीसाठी ऑनलाईन विनंती करतात. पात्र नातेवाईक व वकील यांना कारागृहाकडून व्हीसी मुलाखतीला मान्यता मिळते. त्यानंतर त्यांच्या ई-मेलवर व्हीसी भेटीची वेळ व दिनांक निश्चीत केली जाते. त्यानंतर कैद्याची कारागृहातून व्हीसीद्वारे नातेवाईक किंवा वकिलांशी भेट घडते.

वेळ आणि श्रमाची बचत

व्हीसी मुलाखतीमुळे कैद्याचे नातेवाईक व वकील यांच्या वेळ, श्रम व पैशाची बचत होणार आहे. आजारी व वयस्कर नातेवाईक तसेच लहान मुले यांना प्रत्यक्ष मुलाखतीस येण्याची दगदग करण्याची गरज नाही. जिल्हा, परराज्यातील किंवा विदेशातील नातेवाईक यांना घरुन मुलाखत घेता येणार आहे. त्यामुळे त्यांचा त्रास कमी होणार आहे. तसेच प्रत्यक्ष कारागृहात मुलाखतीकरीता येणारे नातेवाईक व वकील यांची संख्या कमी होईल.