ACB Amravati : पोलीस शिपायानेच घेतली लाच!

A police constable arrested for accepting a bribe of Rs 3000 : अमरावती ACB ची अकोला जिल्ह्यात कारवाई

Akola : अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB), अमरावतीच्या पथकाने पातुर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई पवन सुनिल भाकरे (वय ३६) याला ३,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रारदाराविरुद्ध पूर्वी पातुर पोलीस ठाण्यात देशी दारू विक्रीचे गुन्हे दाखल होते. मात्र, त्यांनी हा व्यवसाय बंद करून मजुरीला सुरुवात केली होती.

आरोपी पोलीस शिपाई पवन भाकरे यांनी तक्रारदाराला त्याच्या पूर्वीच्या गुन्ह्यांच्या नोंदीच्या आधारे तडीपारीची कारवाई न करण्यासाठी ५,००० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने यासंदर्भात दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, अकोला येथे तक्रार दाखल केली. पडताळणी दरम्यान, आरोपीने तडजोडीनंतर ३,००० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

Amravati Crime Branch : शेती अवजारे चोरणाऱ्या टोळीला अटक

त्यानुसार, आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी ACB पथकाने सापळा रचला. पवन भाकरे याला पातुर पोलीस ठाण्यात ३,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी आरोपी पोलीस शिपायाविरुद्ध पातुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही प्रकारच्या लाचखोरीविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, ललित सेंटर, परांजपे कॉलनी, अमरावती (०७२१-२५५२३५५, टोल-फ्री नंबर: १०६४) येथे संपर्क साधावा, असे आवाहन ACB ने केले आहे.

PM Awas Yojana : १९ हजार ८५ लोकांना आज मिळणार हक्काचं घर!

ही कारवाई मारुती जगताप (पोलीस अधीक्षक, ACB अमरावती परिक्षेत्र), सचिंद्र शिंदे (अप्पर पोलीस अधीक्षक, ACB अमरावती परिक्षेत्र) आणि मिलिंदकुमार बहाकर (पोलीस उपअधीक्षक, ACB अकोला) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा रचण्यासाठी पो.नि. भारत जाधव, पो. हवा. दिगंबर जाधव, पोलीस अंमलदार उपेंद्र थोरात, संदीप ताले, किशोर पवार आणि पो. हवा. चंद्रकांत जनबंधु यांनी भूमिका बजावली.