Husband committed suicide due to wife’s extra marrital affair : आत्महत्येप्रकरणी पत्नीला अटक; प्रियकर फरार
Nagpur पती-पत्नीचा सुखी संसार सुरु असतानाच पत्नीच्या आयुष्यात प्रियकर आला. ती प्रियकराच्या एवढी प्रेमात गुंतली की, आपण विवाहित आहोत, याचेही भान तिला राहिले नाही. पती घरात असतानाही ती प्रियकराला घरी भेटायला बोलवायची. पतीने विरोध केल्यास प्रियकराच्या मदतीने पतीला मारहाण करीत होती. अखेर पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नागपूर येथील मानकापूर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी महिला व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिलेला अटक केली असून तिचा प्रियकर फरार झाला आहे.
त्यांना दोन मुले आहेत. संसार व्यवस्थित सुरु असतानाच दुर्गेश्वरीच्या आयुष्यात राहुल नावाचा युवक आला. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली. दोघेही मोबाईलवरुन एकमेकांच्या संपर्कात राहायला लागले. त्यानंतर दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. पती कामाला निघून गेल्या दोघांच्याही चोरून लपून भेटी व्हायला लागल्या. पती घरी नसताना ती राहुलला फोन करायची. त्यानंतर दोघेही तासनतास घरात एकटे असायचे.
Governor C. P. Radhakrushnan : शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करा!
पती येण्यापूर्वी राहुल तिच्या घरुन निघून जात होता. दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण पती नरेंद्रला लागली. त्यामुळे तो पत्नीवर लक्ष ठेवायला लागला. नरेंद्र कामावर गेल्यानंतर तासाभरात घरी परत आला. त्यावेळी राहुल घरात आढळून आला. दुर्गेश्वरीने पतीला मित्र असल्याची ओळख करुन दिली. भेटायला आल्याचे सांगून राहुलला थांबायला सांगितले.
तेव्हापासून राहुल बिनधास्तपणे दुर्गेश्वरीच्या घरी यायला लागला. दोघांचे प्रेमसंबंध खुलेपणाने सुरु झाले. त्यामुळे पती नरेंद्रने तिच्याशी वाद घालून प्रेमप्रकरण बंद करण्यास सांगितले. मात्र, पत्नी प्रियकराला सोडायला तयार नव्हती. दुर्गेश्वरी आणि राहुल हे बेडरुममध्ये बसलेले असताना नरेंद्रने आक्षेप घेतला. त्यामुळे पत्नी व प्रियकराने त्याला मारहाण केली. तसेच प्रेमसंबंधाची कबुली दिली.
त्यामुळे अपमानीत झालेल्या नरेंद्रने १७ फेब्रुवारीला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सुरुवातीला मानकापूर पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. नरेंद्रने आत्महत्यापूर्वी ‘सुसाईड नोट’ लिहिली होती. त्यात पत्नी व राहुल यांच्यातील अनैतिक संबंधामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला होता. त्यावरून पत्नीला अटक करण्यात आली.