Breaking

POCSO case : तक्रार तर घेतली नाही, पैसे मात्र घेतले!

 

Police officer suspended who refuses to accept complaint : पोक्सो तक्रारीबाबत हयगय करणाऱ्या एपीआयसह शिपाई निलंबित

Gondia अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्या अत्याचाराची तक्रार करण्यासाठी पीडित पोलीस ठाण्यात आली. परंतु तक्रारकर्तीलाच धमकावून तिच्याकडून २५ हजार व आरोपीकडून १ लाख रुपये घेणाऱ्या पोलिस शिपायासह एपीआयला निलंबित करण्यात आले.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी ही कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक सुमेध खोपीकर व पोलिस शिपाई प्रवीण रहिले बक्कल नंबर ९८६ अशी निलंबित करण्यात आलेल्या एपीआय व पोलिस शिपायाचे नाव आहे. ते दोघेही रामनगर पोलिस ठाण्यात कार्यरत हाेते. कुडवा येथील एक १५ वर्षांची मुलगी दि. ९ फेब्रुवारी रोजी शहरातील रामनगर पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेली. परंतु तिलाच धमकावून तिच्या नातेवाइकांकडून २५ हजार रुपये घेतले.

Nagpur Municipal Corporation : थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीचा होणार लिलाव?

 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. १० फेब्रुवारी रोजी या प्रकरणात ज्या तरुणावर आरोप होता तो प्रशिक भारतलाल लांजेवार (२३, रा. बनाथर) याला बोलावून त्याच्याजवळूनही एक लाख रुपये घेतले. तर पोस्कोची तक्रार आली हे ठाणेदाराला कळू दिले नाही. सहायक पोलिस निरीक्षक सुमेध खोपीकर याने पोलिस शिपाई प्रवीण रहिले याच्या मदतीने पीडितेकडून आणि आरोपीकडून पैसे घेतले.

या संदर्भात ठाणेदार यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्याकडे केली. त्या तक्रारीवरून पोलिस अधीक्षकांनी दि. २२ फेब्रुवारी रोजी त्या दोघांना निलंबित केले.

Accident in Nagpur : एकाच्या अंगावरून ट्रकचे चाक; दुसऱ्याला धडक

 

१५ वर्षांच्या पीडितेचा मानलेला भाऊ तिला तक्रार करण्यासाठी मदत करीत असताना सहायक पोलिस निरीक्षक सुमेध खोपीकर याने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्याला घाबरवून त्याच्याजवळून २५ हजार रुपये घेतले. पैसे घेण्याचा व्यवहार रामनगर पोलिस ठाण्याच्या कॉर्नरवर असलेल्या चहा-पान दुकानावर करण्यात आला.

सहायक पोलीस निरीक्षक सुमेध खोपीकर याने त्या पीडितेला धमकाविल्याामुळे ती मुलगी घरी गेली. तक्रार करायला पुढे येत नव्हती. परंतु ठाणेदाराच्या लक्षात ही गंभीर बाब आल्याने त्यांनी तिला बोलावून विश्वासात घेतले. महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती नेहे यांच्या हस्ते तिला बाल कल्याण समिती गोंदिया यांच्यासमोर हजर केले.

DBT portal process in Government scheme : साडेपाच हजार जणांचे अनुदान रखडणार

 

त्यांनी अल्पवयीन पीडित मुलीचे बयाण नोंदवून घेतले, तर तिच्या आईच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ६५ (१),७५ (२), ३५१ (२), सहकलम ४, ८, १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये आरोपी प्रशिक भारतलाल लांजेवार (२३, रा. बनाथर, ता.जि. गोंदिया) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गांभीर्य बघता वेळीच दखल घेणे गरजेचे होते. परंतु प्रकरणाची दखल न घेता व पोक्सोचा गुन्हा नोंद न करता तीन दिवस वरिष्ठांपासून दडवून ठेवले. पोक्सोच्या प्रकरणाची गांभीर्यता बघता प्रामाणिकपणे व निस्वार्थपणे तसेच कर्तव्यास अधिन राहून प्रकरण वरिष्ठांचे अवलोकनार्थ सादर करणे आवश्यक होते. परंतु यात कसूर केल्याने दि. २२ फेब्रुवारी रोजी त्या दोघांना निलंबित करण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.