Breaking

CM Devendra Fadnavis : South Korea ची ह्योसंग कंपनी नागपुरात!

South Korea’s Hyosung Company project at Butibori in Nagpur : राज्य सरकारसोबत १७४० कोटींच्या गुंतवणुकीचा करार

Nagpur नागपुरात सातत्याने मोठ्या कंपन्यांचे प्रकल्प सुरू होत आहेत. यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकल्पांचा समावेश आहे. मिहानमुळे तर अनेक वर्षे खितपत पडलेल्या बुटीबोरीमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहेच. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे हे होत आहे. आता दक्षिण कोरियाच्या ह्योसंग कंपनीचा प्रकल्पही नागपुरात येत आहे.

नागपूर व विदर्भात उद्योगधंदे येऊन जास्तीत जास्त प्रमाणात गुंतवणूक यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. याच दृष्टीने आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या औद्योगिक समूहातील एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनीसोबत HSHyosung Advanced Materials महाराष्ट्र शासनाचा १७४० कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. ही कंपनी आता पुणे, छत्रपती संभाजीनगर सोबतच नागपुरात आपल्या कार्याचा विस्तार करत आहे.

Vijay Wadettiwar : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कोरटकरला सुरक्षा का?

हा सामंजस्य करार उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीआँग यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ह्युसंग कंपनी नागपूरच्या बुटीबोरी येथे नवीन अध्याय सुरू करत असताना पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे आणखी विस्तार करण्याची आशा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. ही गुंतवणूक नागपूरच्या बुटीबोरी येथे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादन क्षेत्रात केली जाणार असून यामुळे ४०० स्थानिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या करारादरम्यान मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, ह्योसंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सी इयान ली, वरिष्ठ सल्लागार कॅप्टन शिवाजी महाडकर, संचालक मनोजित साह, उपव्यवस्थापक नीरज हांडा उपस्थित होते.

Prashant Koratkar : कोरटकरच्या घरी धडकले कोल्हापूर पोलीस!

ह्युसंग समूह ही दक्षिण कोरियन कंपनी असून टेक्सटाईल्स, केमिकल्स, अवजड उद्योग, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी कार्बन फायबर, अरामिड फायबर, टायर कॉर्ड, ऑटोमोटिव्ह सीट बेल्ट यार्न, हाय-स्ट्रेंथ इंडस्ट्रियल यार्न आणि फॅब्रिक्स यांच्या उत्पादनात आघाडीवर आहे. ही कंपनी नागपुरात आल्यावर रोजगारालादेखील चालना मिळेल.