Akola-Mahan highway will be four lane : शीघ्रगती मार्गासाठी निर्णय, खासदार धोत्रेंनी केली होती मागणी
Akola अकोला ते महान हा महामार्ग फोर लेन (चौपदरीकरण) करण्याचा तसेच दहा मीटरचा दर्जेदार रस्ता तयार करण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. बार्शिटाकळी, अकोला, बाळापूर, कारंजा आणि वाशिम जिल्ह्यात जाणाऱ्या वाहतुकीला वेग मिळावा. आणि समृद्धी महामार्गासाठी शीघ्रगती मार्ग उपलब्ध व्हावा. या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
खासदार अनुप धोत्रे यांनी अकोला ते कान्हेरी हा रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत कौलखेड ते कान्हेरी सरप हा रस्ता चौपदरीकरण करण्यास तसेच कान्हेरी सरप रस्ता दहा मीटरचा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तथापि, जलवाहिनी आणि वनीकरणामुळे काही भागात चौपदरीकरण शक्य नसल्याने तो दहा मीटरचा केला जाणार आहे. यासाठी लवकरच भरघोस निधी मंजूर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Jitendra on Nitin Gadkari : जितेंद्र म्हणाले, गडकरींनी बोलावले म्हणून, नाहीतर बहाणा केला असता !
हा महामार्ग २०० गावांसोबतच अन्य राज्यांनाही जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. शेतकरी, व्यापारी आणि सामान्य प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. अकोला वाशिम जिल्ह्यांसाठीही हा विकासाचा महत्वपूर्ण टप्पा असेल.
हा प्रस्ताव खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे नॅशनल हायवे विभागाने दळणवळण मंत्रालयाकडे पाठवला असून, लवकरच निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. माजी खासदार संजय धोत्रे यांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता होत असल्याने खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, Timepass करणाऱ्यांना सस्पेंड करा !
हा महामार्ग अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर आणि मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या मतदारसंघातून जात असल्याने त्यांनीही गडकरी यांचे आभार मानले आहेत. हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.