Technology will be game changer for Trillion-Dollar Economy : Meta सोबत माहिती तंत्रज्ञान विभागाचा करार
Mumbai महाराष्ट्र शासनाच्या धोरणांमुळे राज्य हे देशाच्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानच हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असणार आहे. फिनटेक आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई टेक वीक 2025 चा आज शुभारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली. War Room मुळे प्रकल्पांच्या निर्णय प्रक्रियेला वेग मिळला आहे. पूर्वी मुंबईत एखादा प्रकल्प सुरू करण्यासाठी 18 विविध सरकारी यंत्रणांची परवानगी घ्यावी लागायची, त्यामुळे प्रकल्पांना विलंब होत असे. वॉर रूमच्या माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणले. आणि त्वरित निर्णय घेण्यास सुरुवात केली, असं ते म्हणाले.
Devendra Fadanvis : केंद्र शासनाकडून वित्त पुरवठा व्याजदर कमी असावेत!
आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र सरकार तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. यात वाढवण बंदर हा प्रकल्प मुंबईच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडविणारा आहे. हा पोर्ट सध्याच्या जे.एन.पी.टी. पेक्षा तीनपट मोठा आहे. 20 मीटर खोल बंदर असल्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजे येथे थांबू शकतील. भारताला जागतिक सागरी व्यापारात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारा हा बंदर प्रकल्प असेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा आणि गोदावरी जलप्रकल्प हाती घेतले जात आहेत. या प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेती उत्पादन वाढणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
CM Devendra Fadnavis : South Korea ची ह्योसंग कंपनी नागपुरात!
राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना संदर्भात त्यांनी माहिती दिली.आज जगभरातील गुन्हेगारी सायबर जगतात शिफ्ट होत आहे. भविष्यात 70% गुन्हे हे सायबर गुन्हे असतील. त्यामुळे आम्ही नवी मुंबईत भारतातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारले आहे. सर्व बँका, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना या यंत्रणेशी जोडले आहे. त्यामुळे आता कोणत्याही आर्थिक फसवणुकीवर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.








