68 Gram Panchayats will get own building : ६८ ग्रामपंचायतींना मिळणार हक्काची इमारत !

Gram Panchayats office are working in school rooms : शाळेच्या खोलीत, सामाजिक सभागृहात सुरू आहे कारभार

Akola जिल्ह्यात स्वत:ची इमारत नसलेल्या ६८ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी १४ कोटींच्या निधीतून ग्रामपंचायत भवन उभारणीसाठी मंगळवार, १४ जानेवारीला ई-निविदा उघडण्यात येणार आहे. लवकरच जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत या कामांचे Work Order देण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ६८ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत मिळणार आहे.

ग्रामपंचायत भवन नसल्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित गावांतील जिल्हा परिषद शाळा, सामाजिक सभागृहांमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यालय बांधकामांसाठी जिल्हा परिषद, पंचायत विभागामार्फत वर्षभरापूर्वी शासनाच्या ग्राम विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या अनुषंगाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजनेंतर्गत १४ कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास शासनामार्फत गेल्या ऑगस्टमध्ये मंजुरी देण्यात आली.

Justice Devendrakumar Upadhyay : प्रलंबित प्रकरणांवर मुख्य न्यायमुर्तीं स्पष्टच बोलले

त्यानुसार जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामांसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ही प्रक्रिया पूर्ण होताच ६८ ग्रामपंचायतींच्या बांधकामांसाठी ‘वर्क ऑर्डर’ देण्यात येणार आहेत.

ग्राम सचिवालयाचा कारभार
जिल्ह्यातील ६८ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार गावातील शाळेच्या खोलीत, सामाजिक सभागृहात सुरू आहे. आता ग्रामपंचायत इमारत उभारणीचे कामकाज सुरू होणार असल्याने, संबंधित ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत उपलब्ध होणार आहे.

Gandhi Smarak Samiti : गांधी-विनोबांमुळे सेवाग्राम हे तीर्थस्थान

विकासकामे रखडली होती
लोकसभा व त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील विकास कामे रखडली होती. आता आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यात ही कामे पूर्ण करण्याकडे प्रशासनाचा भर आहे. त्यासाठी तातडीने कार्यारंभ आदेश काढण्यात येत आहे. शक्य तेवढ्या लवकर ही कामे पूर्ण करण्याकडे लक्ष पुरवल्या जाणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

प्रस्तावित ग्रामपंचायत इमारतींची कामे

तालुका ग्रामपंचायती
अकोला १४
अकोट १२
बाळापूर ०८
बार्शिटाकळी १५
मूर्तिजापूर ०६
पातूर १०
तेल्हारा             ०३