Police revealed the murder case : आईनेच संपवले मुलीचे जीवन!

The mother ended the life of the girl : आईला प्रियकरासह अटक; पोलिसांनी उघडकीस आणले हत्याकांड

अनैतिक संबंध ठेवण्यात पोटची मुलगी (वय ३ वर्षे) अडसर ठरत होती. त्यामुळे महिलेने आणि तिच्या प्रियकराने मुलीचा निर्दयतेने खून केला. मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाटही लावली. मात्र, या हत्याकांडाची कुणकुण नागरिकांना लागली. त्यामुळे खापरखेडा पोलिसांनी पुढाकार घेऊन हे हत्याकांड उघडकीस आणले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला व तिच्या प्रियकराला अटक केली.

निता चामलाटे (२८, नांदा) आणि राजपाल मालविय (३२, रा. देवास) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराचंद्र चामलाटे याला दोन बायका आहेत. त्याची दुसरी बायको ही निता असून तिला तीन वर्षाची मानसी नावाची मुलगी होती. निता ही पतीसह नांदा गावात कामानिमित्ताने आली होती. दरम्यान, तेथेच कामाच्या शोधात आलेला युवक राजपाल मालविय याच्याशी तिची ओळख झाली.

Yavatmal Zilla Parishad : जिल्हा परिषदेसमोर ‘सेस’ निधी खर्चाचे आव्हान !

काही दिवसांत दोघांचे सूत जुळले. ताराचंद्रला दारुचे व्यसन होते. त्यामुळे तो नेहमी दारुच्या नशेत असल्यानंतर राजपाल घरी येत होता. राजपाल आणि निता यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. मात्र, आपल्या प्रेमसंबंधात मानसी अडसर ठरत आहे, असे निताला वाटले. त्याचवेळी पत्नीचे राजपालशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पती ताराचंद्रला लागली. त्यामुळे त्याने आपले मूळ गाव भंडारा गाठले.

प्रियकर राजपालने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, तीन वर्षीय मुलगी पतीकडे किंवा कुटुंबियांकडे ठेवण्याची अट त्याने ठेवली. पतीकडे मुलीला ठेवणे शक्य नसल्यामुळे निता अडचणीत आली. राजपाल आणि निताने मुलीचा खून केला. मृतदेहाची विल्हेवाट भंडारा जिल्ह्यात लावली. मात्र, पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला. गुन्हा दाखल करुन दोघांनाही खापरखेडा पोलिसांनी अटक केली.

असा लागला छडा
निता आणि राजपाल यांनी २६ डिसेंबरला मुलीच्या डोक्यात काठी मारुन तिचा खून केला. मुलीचा मृतदेह पहिला पती ताराचंद्र याच्या घरी नेला. मुलगी घराच्या छतावरुन खाली पडून जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर गावात मुलीचा अंत्यसंस्कार करण्यात आला. पण ताराचंद्रची दुसरी बायको कल्पना हिला मुलीच्या अपघाती मृत्यूवर संशय आला. तिने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुरलेला मृतदेह गोंदीयातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी निताला ताब्यात घेऊन खाक्या दाखवल्या. निताने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.