Breaking

Ambadas Danve : राज्यपालांच्या अभिभाषणाचे अंबादास दानवेंनी केले पोस्टमार्टम !

 

Ambadas Danve conducted a post-mortem on the Governor’s speech : रेशन दुकानांत साखर नाही, सोयाबीनसाठी बारदाने नाही, चाललंय काय?

Mumbai : राज्यात महिलांचा सतत होत असलेला अवमान, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना, बेळगाव कर्नाटक सीमावादावर स्थापन केलेल्या समितीचा समनव्याचा अभाव, शेतकऱ्यांवर थोपवलेला शक्तीपीठ मार्ग, दावोसमध्ये केलेले करार आदी मुद्द्यांवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणातील मुद्दे खोडून काढले.

सरकारवर चौफेर टीका करत हे सरकार जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध नसल्याचे म्हणत राज्यपालांनी सरकारच्या प्रगतीवर केलेल्या अभिभाषणावर अंबादास दानवे यांनी खेद व्यक्त केला. एकीकडे राज्यपाल भाषणात म्हणाले, सरकार प्रगतीपथावर आहे, मात्र हे सरकार फक्त निविदा काढतं आणि त्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही तरतूद करत नाही. एकप्रकारे राज्याची अधोगती सुरू आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला, असा सवाल दानवे यांनी केला.

Raj Thackeray : मराठीचा मुद्दा, राज ठाकरेंचा गुद्दा!

9 महिन्यांपासून रेशन दुकानावर साखर नाही. बारदान आणि गोदाम नसल्यामुळे 50 टक्के सोयाबीनची खरेदी रखडली आहे. पालघर जिल्ह्यात वर्षभरात 14 मातांचा मृत्यू झाला आहे. पीक विम्यावर कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची केलेली थट्टा, मंत्र्यांनी पीडित तरुणीविषयी केलेलं असंवेदनशील वक्तव्य, दुसऱ्या मंत्र्याने मोठया घराण्यातील महिलेला पाठविलेले अश्लील फोटो यावर दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र डागले. कुंपणच शेत खात असतील तर इतरांनी काय करावं, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

Animal organ trafficking : घोड्याच्या पायाची चमत्कारी अंगठी घाला, भूतबाधा निघून जाईल

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर आणि अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही दानवे यांनी सभागृहात लावून धरली. एका मराठी अल्पवयीन मुलीवर कानडी कंडक्टरने केलेल्या प्रकारामुळे त्याला मारहाण करण्यात आली. त्याने अन्याय करूनही कर्नाटकच पूर्ण राज्य त्याच्या मागे उभं राहिलं. मात्र महाराष्ट्रच्यावतीने कोणतीही भूमिका घेतली गेली नाही, याबाबत नाराजी व्यक्त करत बेळगाव निपाणी हे भाग आपले असतील तर त्यांच्या विषयी ममत्व असलं पाहिजे, असे दानवे म्हणाले.