Breaking

Shakti Peeth Highway : समृद्धी नागपुरातून तर शक्तीपीठ सुरू होणार सेवाग्राममधून

 

 

Samruddhi started from Nagpur, while Shakti Peeth will start from Sevagram : सेवाग्रामच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार

Wardha : देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे केंद्रस्थान असलेल्या सेवाग्रामच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. राज्य सरकारच्या शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात सेवाग्राम येथून होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले.

सेवाग्रामची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. सेवाग्राम महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिली आहे. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत परिसराचा भाजप सरकारच्या काळात विकास झाला. त्यानंतर भाजप सरकारने सेवाग्रामला पुन्हा एक अनोखी भेट दिली आहे. नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

CM Devendra Fadnavis : डीप फेक आणि मॉर्फिंग रोखण्यासाठी विशेष नियोजन!

८०२ किलोमीटरच्या या मार्गामुळे विदर्भ व मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या दोन्ही भागांच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई तुळजाभवानी माता, माहूरची रेणुका माता, अंबाजोगाईची योगेश्वरी माता आदी शक्तिपीठे एकमेकांशी जोडल्या जाणार आहे. परळी वैजनाथ, औंढा नागनाथसह अन्य तीर्थस्थळेदेखील मार्गाशी जोडली जाणार आहेत. हा महामार्ग पर्यटनासोबतच मराठवाडा व विदर्भाच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे.

CM Devendra Fadnavis : ‘एआय अनझीप्ड’ पुस्तकामुळे कार्यक्षमता वाढेल

शक्तिपीठ हा महामार्ग बारा जिल्ह्यांतून जाणार आहे. समृद्धी महामार्गाशी जिल्ह्याला जोडल्यानंतर आता शक्तिपीठ महामार्गदेखील जिल्ह्यातून जात असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती मार्गाचे बांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

Dr. Pankaj Bhoyar : पालकमंत्र्यांचा कानमंत्र, आयुष्याचा निर्णय योग्यवेळी निर्णय घ्या!

शक्तिपीठ महामार्ग आगामी काळात सर्वांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे. या द्रुतगती मार्गामुळे मार्गावरील प्रमुख धार्मिक क्षेत्र व तीर्थस्थळे जोडण्यात येणार आहे. तसेच विकासाला गती मिळण्यासोबतच प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. या महामार्गाची सुरुवात सेवाग्राम येथून होणार आहे. त्यामुळे आर्थिक विकासालादेखील चालना मिळणार असल्याचे डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.