Breaking

Indian Railways : भारतीय रेल्वेने गाठला महिला सशक्तीकरणाचा नवा टप्पा

Indian Railways reaches new milestone in women empowerment : भुसावळ विभागातील पहिले “पिंक स्टेशन” – नवी अमरावती स्थानक

Amravati : भुसावळ विभाग महिलांना समान संधी प्रदान करण्यात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. महिलांचे सशक्तीकरण आणि सार्वजनिक सेवेत कार्यक्षमतेचे उत्कृष्ट मिश्रण साधत, भुसावळ विभागाने नवी अमरावती स्थानक हे संपूर्णतः महिलांनी व्यवस्थापित केलेले पहिले “पिंक स्टेशन” म्हणून विकसित केले आहे. ऑगस्ट 2023 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमामुळे भुसावळ विभागाने इतिहास रचला आहे.

अमरावती स्थानकावर महिला कर्मचारी स्थानकाचे नेतृत्व करतात. या स्थानकाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी 15 समर्पित महिला कर्मचाऱ्यांच्या संघावर सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये 4 उपस्थानक अधीक्षक, 4 पॉईंट वुमन, 3 रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) महिला जवान, 2 सिग्नल आणि टेलिकॉम कर्मचारी, 1 स्टेशन तिकीट बुकिंग एजंट आणि 1 स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे.

Indian Railway Ministry : जनतेनेच घेतला फॉलो-अप; रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी !

या महिला कर्मचारी तिकीट व्यवस्थापन, सुरक्षा, स्थानक संचालन आणि देखभाल अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडत आहेत. हा उपक्रम महिलांना सक्षम बनवतोच. पण त्यांना स्वायत्त निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी देखील देतो.

नेतृत्व आणि यशस्वी अंमलबजावणी..
स्थानक व्यवस्थापक मंजू निषाद यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबवला जात आहे. त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्यामुळे स्थानकाचे सर्व व्यवहार सुरळीत पार पडत आहेत आणि महिलांच्या हाताळणीमुळे स्थानक अधिक कार्यक्षम बनले आहे.

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचं ओझं नाही !

रेल्वे क्षेत्रातील महिलांची मजबूत उपस्थिती..
हा उपक्रम महिलांच्या सहभागाचे प्रतीक ठरला आहे. योग्य संधी आणि पाठिंबा मिळाल्यास महिला कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे. रेल्वेसारख्या पारंपरिकरित्या पुरुषप्रधान क्षेत्रात महिलांनी नेतृत्व करणे ही सकारात्मक बदलाची नांदी आहे.

Akola Cyber ​​Cell : अकोला पोलिसांकडून सायबर पेट्रोलिंग; ४१ आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या

भविष्यासाठी प्रेरणादायी पाऊल..
भुसावळ विभागासाठी हा उपक्रम गौरवाची बाब आहे. भविष्यातही महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या सहभागाला चालना देणारे उपक्रम हाती घेण्यास विभाग वचनबद्ध आहे. महिलांना संधी देऊन प्रगतशील आणि सर्वसमावेशक कार्यसंस्कृती निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे सांगण्यात आले आहे.