Breaking

Harshawardhan Sapkal : राजीनामा तर देवेंद्र फडणवीसांनीच द्यायला पाहिजे !

 

Devendra Fadnavis should resign : सद्भावना यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही कार्यकर्ते व जनतेचा प्रचंड उत्साह

Beed / Mumbai : औरंगजेबाने वडिलांना कैद करून, भावाचा खून करून राज्य मिळवले. तर देवेंद्र फडणवीस यांनी संविधान आणि कायदा सुव्यवस्थेला कैद करून ठेवले आहे. औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार सारखाच आहे, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजीनामा धनंजय मुंडे यांचा घेतला. पण खरे पाहता याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचाच राजीनामा झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख भाजपचा कार्यकर्ता होता. त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली. पण भाजपाचे प्रांताध्यक्ष देशमुख यांच्या घरी गेले नाहीत. पण विरोधी पक्षाचा प्रांताध्यक्ष जाऊन भेटतो, हा भाजप व काँग्रेसच्या विचारांतील फरक आहे, असेही सपकाळ म्हणाले. मस्साजोमधून निघालेली सद्भावना पदयात्रा दोन दिवस व ५१ किलोमीटरचा प्रवास करून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पोहोचली. तेथे सद्भावना मेळाव्याने यात्रेची सांगता झाली.

Harshawardhan Sapkal : मढीच्या दुकानदारांना सपकाळ यांनी दिला धीर !

बीड जिल्हा आज सुरक्षित नाही तर उद्या शेजारचे जिल्हेही सुरक्षित राहू शकणार नाहीत. त्यामुळे याची काळजी घ्यावी लागणार आहे. भाजपाने राज्यात द्वेष पसरवण्याचे काम केले. त्याला सद्भवानेने उत्तर द्यावे लागणार आहे. आधी ‘पन्नास खोके, एकमद ओके’, असे होते, पुन्हा ‘बोल मेरे आका’, आले आणि आता ‘खोक्या’ समोर आला आहे. फडणवीस गृहमंत्री आहेत. पण ते बीड प्रकरणावर बोलत नाहीत. दुसऱ्याला पुढे करतात.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, सद्भावना पदयात्रेने, ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ हा राहुल गांधी यांचा संदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी पोहोचवला आहे. बीड जिल्हा हा सद्भावना जोपसणारा आहे. बीड जिल्ह्याची आजची जी परिस्थिती आहे, ती यापूर्वी कधीच अशी नव्हती. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा जिल्हा आहे. विठ्ठलाच्या वारीत जसा वारकरी एका ऊर्जेने चालतो तीच ऊर्चा या पदयात्रेत दिसली. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपद्धताने करण्यात आली. राज्यघटना हे आपले तत्वज्ञान असेल तर तिथे समाजात भेदभावाला स्थान नाही.

Harshawardhan Sapkal : महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागली !

यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, हिमाचल प्रदेशच्या प्रभारी खासदार रजनी पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल बाबा पाटील, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, रविंद्र दळवी, खासदार डॉ. कल्याणराव काळे. खासदार डॉ. शिवाजी काळगे, ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर, माजी मंत्री वसंत पुरके, आमदार राजेश राठोड, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, इंटकचे अध्यक्ष कैलास कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस आबा दळवी, अमर खानापूरे, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे, जालना काँग्रेसचे कार्याध्यक्ष भगवानगडाचे विश्वस्त राजेंद्र राख, एस. सी. विभागाचे सिद्धार्थ हत्तिअंबिरे आदी उपस्थित होते.