Breaking

anchit Bahujan Aghadi : वंचितचा विरोध, जनसुरक्षा विधेयक अन्यायकारक!

Maharashtra Special Public Security Bill is unfair : महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात एल्गार

Akola महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हा लोकशाहीविरोधी आणि अन्यायकारक आहे. हे विधेयक सामान्य जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. या विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी जाहीर केले.

डॉ. पुंडकर म्हणाले, “सरकार हा कायदा आणून लोकशाही मूल्यांची गळचेपी करू पाहत आहे. या कायद्याच्या मदतीने सरकारला हुकूमशाही धोरण अवलंबण्याची मुभा मिळेल, आणि तो विरोधी आवाज दडपण्यासाठी वापरण्यात येईल. त्यामुळे आम्ही या कायद्याविरोधात तीव्र आंदोलन उभारणार आहोत.

Local Body Elections : चिखली तालुक्यात निवडणुकीचे पडघम, उमेदवार लागले तयारीला

या विधेयकामुळे सरकारला अमर्याद अधिकार मिळतील, आणि कोणत्याही नागरिकाविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्वातंत्र्य राहील, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. सरकार हा कायदा वापरून सामाजिक चळवळींना तसेच विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करू शकते. त्यामुळे लोकशाही धोक्यात येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

MLA Shweta Mahale : अवैध गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांना जामीनच मिळू नये

या विधेयकाविरोधात लवकरच राज्यभर जनजागृती मोहीम राबवली जाईल आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल, असे डॉ. पुंडकर यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, समर्थक आणि जनतेचा मोठा वर्ग या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरेल. सरकारने हा कायदा मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात इतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि जनतेची काय भूमिका असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.