Breaking

Riots in Mahal Nagpur : नागपुरात दंगल; अकोल्यात अलर्ट!

 

Security tightened in Akola city after Nagpur incident : नागपुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवला

Akola मध्य नागपूरच्या महाल परिसरात दि. १७ मार्चला घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हरिहर पेठ, हमजा प्लॉट, पोळा चौक, जय हिंद चौक यासह शहरातील संवेदनशील भागांत मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

या भागात स्थानिक पोलिसांसह विशेष सुरक्षा पथक (SRP) आणि अतिशय शीघ्र कृती दल (Rapid Action Force – RAF) यांच्या तुकड्यांचीही संयुक्तपणे तैनाती करण्यात आली आहे. नागपूरमध्ये झालेल्या घटनेमुळे संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेत अकोला पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली आहे.

Tension in Mahal Nagpur : नारेबाजी झाली नसती तर दंगल पेटलीच नसती!

अकोला शहर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानले जाते. यापूर्वीही शहरातील जुने शहर भाग, विशेषतः हरिहर पेठ आणि हमजा प्लॉट परिसरात दोन गटांमध्ये वाद झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासन विशेष सतर्क आहे.

अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी परिस्थितीचा आढावा घेत पोलीस दलाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. महत्त्वाच्या चौकाचौकांत गस्त वाढवण्यात आली आहे. कोणत्याही अफवांना थारा दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर आहे.

Buldhana Police : बेपत्ता मुलींचा शोध घेणार आहात की नाही?

पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती मिळवावी, असे प्रशासनाने सांगितले आहे. बंदोबस्तामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. ही फक्त खबरदारी घेण्याची प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या अकोला शहरात पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख ठेवली जात आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचे पथक सातत्याने गस्त घालत आहे. तसेच, नागरिकांच्या सहकार्यानेच शांतता कायम ठेवली जाऊ शकते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.