Hundreds of farmers arrested in Mumbai : सातबारा बुडवायला बोटीने समुद्रात पोहोचले कार्यकर्ते
Buldhana दुपारी बारा वाजता रखरखत्या उन्हात हजारो शेतकऱ्यांनी पनवेल मार्गे मुंबईच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये तुफान संघर्ष झाला. हातात दंडुके घेतलेल्या पोलिसांशी शेतकऱ्यांची चकमक झाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून रविकांत तुपकर, ऍड. शर्वरी तुपकर, प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, नारायण लोखंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना अटक केली. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
सरकारने पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असला तरी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची धग कायम ठेवली. बुधवारी पहाटेपासून पनवेल नजीक नढळ येथे हजारो शेतकऱ्यांना अडवण्यात आले. शांततेत आंदोलन करण्याचा निर्धार असतानाही पोलिसांनी रविकांत तुपकर आणि इतर शेतकऱ्यांना रोखले.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे सरकारला मोठी धास्ती वाटत होती. आंदोलन रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. बुलढाण्यातून निघालेल्या शेतकऱ्यांच्या गाड्या रोखण्यात आल्या, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तुपकर कसेबसे मुंबईत दाखल झाले. त्यानंतर हजारो कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने मुंबईत पोहोचले.
पनवेलजवळील मंदिर संस्थानात मुक्कामी असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले.
दुपारी बारा वाजता हजारो शेतकऱ्यांनी समुद्राकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये तासभर संघर्ष सुरू होता. शेवटी, पोलिसांनी तुपकर आणि इतर शेतकऱ्यांना अटक केली आणि खालापूर पोलिस ठाण्यात नेले. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे.
Ravikant Tupkar : बुलढाणा पोलिसांची रविकांत तुपकरांना नोटीस!
आंदोलन दडपण्यासाठी पोलिस लाठ्या आणि बंदुका घेऊन सज्ज होते. मात्र, शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी पाणी, चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली. सरकारच्या प्रयत्नांना धुडकावून बीड जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या नजरेतून सुटून बोटीने अरबी समुद्रात दाखल होत सातबारे, कापूस आणि सोयाबीन समुद्रात बुडवले. या वेळी ‘आम्ही कर्जमुक्त होणारच’ अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांच्या या कृतीने पोलिसांची तारांबळ उडाली.